boyfriend murdered girlfriend in chhattisgarh 
देश

प्रेयसीला रात्री शेतात भेटायला बोलावले अन्...

वृत्तसंस्था

रायपूर (छत्तीसगड): प्रेयसीला रात्री फोन करून शेतात भेटायला बोलावले. भेटीदरम्यान तिने विवाह ठरल्याचे सांगितले. प्रेयसीचा दुसऱया व्यक्तीसोबत विवाह होणार हे सहन झाले नाही. यावेळी दोघांमध्ये भांडण झाल्याने प्रियकराने प्रेयसीचा गळा दाबून खून केल्याची घटना येथे घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पेड्रीतराई या गावामधील शेतामध्ये युवतीचा मृतदेह आढळून आला. यानंतर कुटुंबियांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तपास केल्यानंतर प्रियकराने तिचा खून निष्पन्न झाले. तिहारी (वय 18) हिचा खून केल्याप्रकरणी रोशन साहूला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिहारी व रोशनमध्ये प्रेमसंबंध होते. रोशन दुसऱया गावामध्ये राहात होता. तिहारीच्या कुटुंबियांनी तिचा विवाह दुसऱया मुलासोबत ठरवला होता. रोशनने तिहारीला फोन करून तिच्या गावामध्ये असलेल्या शेतामध्ये रात्रीच्यावेळी भेटायला बोलावले. यावेळी तिने माझा विवाह ठरल्याचे सांगितले. विवाहाच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये भांडण झाले. यावेळी रोशनने तिहारीचा गळा दाबून खून केला. खुनानंतर तो त्याच्या गावाला गेला. रोशनला ताब्यात घेतल्यानंतर त्याने खुनाची कबुली दिली. पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IIT Bombay Student Endlife : साहिल वाकोडे प्रकरण : तीन दिवसांच्या आंदोलनानंतर आयआयटी बॉम्बे झुकले; विद्यार्थ्यांच्या १८ मागण्या केल्या मान्य

Pune Metro: आयटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! हिंजवडी मेट्रो स्थानकांना कंपन्यांची कार्यालये थेट जोडणार; पादचारी पुलांची तयारी

रागात पाहिल्याने छातीवर सपासप वार..., मुंबईत गणेशोत्सवात रक्तरंजित थरार; 7 जणांकडून मंडळाच्या अध्यक्षाची हत्या

World Alzheimer Day 2026: साठी ओलांडलीय? मग अल्झायमरची ‘ही’ लक्षणं तुम्हाला माहित असायलाच हवीत!

Marathi News Live Updates : येत्या महिनाभरात मुंबई महानगरपालिकेच्या 800 अभियंत्यांची होणार उचलबांगडी, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT