brave daughter saved her mothers life at uttarakhand 
देश

आई, मी आलेच म्हणाली अन् मारली उडी...

वृत्तसंस्था

जोशीमठ (उत्तराखंड) : गंगा नदीच्या किनारी लाकडं गोळा करत असताना एका मातेचा पाय घसरला आणि पाण्यात पडून वाहून लागली. आई वाहून जात असल्याचे 16 वर्षीय मुलीने पाहिले आणि तत्काळ पाण्यात उडी घेतली. आईचा जीव वाचविण्याऱया लेकीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

रविवारी (ता. 7) ही घटना घडली असून, मुलीच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. नेपाळी वंशाच्या रामकली देवी आणि त्यांची 16 वर्षीय मुलगी किरण तपोनवातील धौली गंगा नदीच्या काठावर लाकडं गोळा करत होती. यावेळी रामकली देवी यांचा पाय घसरला आणि त्या नदीत पडल्या. आईला पाण्यात वाहून जात असल्याचे पाहून किरण यांनी पाहिले. आईला आवाज दिला आणि कोणताही विचार न करता नदीत उडी घेतली. आईला वाचविण्यासाठी तब्बल 20 मिनिटे प्रयत्न सुरू होते. किरणने आईला वाचविले आणि नदीच्या किनारी आणले.

प्रत्यक्षदर्शी ओम प्रकाश डोभाल यांनी सांगितले की, आईचे प्राण वाचवण्यासाठी नदीत उडी मारलेली किरणही वाहता वाहता वाचली. पण, तिने जिद्द सोडली नाही. स्वतःसह तिने आईचे प्राण वाचवले.

दरम्यान, याबाबतची माहिती परिसरात समजल्यानंतर नागरिक घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांनी रामकली देवी यांना जोशीमठातील रुग्णालयात दाखल केले. दोघींची प्रकृती सुधारली असून, किरणच्या धाडसाची परिसरात चर्चा सुरू झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bima Yojana: आशा सेविका, कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! राज्य कर्मचारी विमा योजनेचा लाभ मिळणार; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

IND vs IRE 1st T20I: श्रेयस अय्यरने कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात रोहित शर्माचे दोन विक्रम मोडले; आयर्लंडला गोलंदाजांनी रडवले

MPSC Group C Online Exam Protest: एमपीएससी गट-क ऑनलाइन परीक्षेला विद्यार्थ्यांचा तीव्र विरोध; फडणवीसांचे चर्चेनंतरच अंतिम निर्णयाचे आश्वासन

Latest Marathi News Live Update : नाशिक सायबर पोलिसांची कारवाई, ऑनलाइन बेटिंग चालवणाऱ्या पाच आरोपींना केली अटक

ENG vs NZ 3rd Test: बेन स्टोक्सचा भीमपराक्रम! जॅक कॅलिसनंतर जगात असा विक्रम नोंदवणारा तोच; इंग्लंडच्या कर्णधाराने केली हवा...

SCROLL FOR NEXT