bride escaped with lover before marriage at uttarakhand 
देश

माझी होणारी बायको पळाली; मी काय करू...

वृत्तसंस्था

काशीपूर (उत्तराखंड): दोघांच्या विवाहाची जोरदार तयारी झाली होती. विवाहाचा मुहुर्त काही मिनिटांवर येऊन पोहचला असतानाच नवरी प्रियकरासोबत पळून गेली. या घटनेनंतर नवरा म्हणाला, आता मी काय करू....

अजमेर (राजस्थान) येथील युवतीचा काशीपूर येथील युवकासोबत विवाह ठरला होता. विवाहाची तयारी मोठ्या उत्साहात सुरू होती. दोन्ही कुटुंबातील नातेवाईक दोन दिवसांपासूनच कार्यालयात होते. मेंहदी व हाळदीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. दोन्ही कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण होते. विवाहाचा दिवस उजाडल्यानंतर विवाहाची तयारी सुरू होती. नवरा व नवरदेवाने नवीन कपडे घातले होते. नवरदेवाची घोड्यावरून वरात काढण्यात आली. विवाहाला काही वेळ शिल्लक असताना नवरीने धूम ठोकली.

नवरदेव मंडपस्थळी येऊन उभा राहिल्यानंतर नवरीला बोलावण्यात आले. परंतु, बराच वेळ ती न आल्याने शोध घेतला असता ती प्रियकरासोबत पळून गेल्याचे समजले. दोन्ही कुटुंबियांमध्ये जोरदार वादावादी झाली. अखेर प्रकरण पोलिसांपर्यंत पोहचले. नवरदेवाने कपडे काढले आणि फेकून देत मी काय करू म्हणायला लागला. अखेर, नवरदेवाच्या कुटुंबियांनी परतीचा मार्ग धरला...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

USA Winter Storm Warning : ५ दिवसांचे रेशन-पाणी साठवून ठेवा! अमेरिकेत 'विंटर स्टॉर्म वॉर्निंग' जारी; ताशी ६० किमी वेगाचे बर्फाळ वारे अन् १६ इंच बर्फवृष्टीचा मोठा इशारा!

लोकसभेत २७० खासदार वाढणार; सरकारी तिजोरीवर किती कोटींचा बोजा पडणार? पगारापासून घरांपर्यंतचा खर्च वाचा

Kombdi Palali Song Story Bharat Jadhav : 'कोंबडी पळाली' गाण्याच्या शूटसाठी पैसेच नव्हते! भरत जाधवने चक्क घरून पैसे आणले अन्... केदार शिंदेंनी सांगितला 'जत्रा'च्या काळातील भन्नाट किस्सा!

Latest Marathi News Live Update: पंजाबराव डख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा! माजी आमदार भीमराव धोंडेंची थेट पोलिसांत धाव

Crime News: झेड प्लस सुरक्षा असली तरी वाचणार नाहीस; १० कोटी दे, नाहीतर यमराजाला भेटशील!

SCROLL FOR NEXT