Pushpa at Wedding Ceremony
Pushpa at Wedding Ceremony Esakal
देश

Video: नवरदेवाच्या अंगात पुष्पाचं भूत! म्हणाला "मैं झुकेगा नहीं..."

सकाळ डिजिटल टीम

अल्लू अर्जुनचा (Allu Arjin) पुष्पा (Pushpa) चित्रपट प्रदर्शित होऊन दीड महिना उलटला तरी त्याची हवा मात्र अजून कमी झाले नाही. सर्व सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्मवर पुष्पाचाच जलवा आहे. फक्त देशातच नाही तर विदेशातील लोकांनाही चित्रपटाने भुरळ घातली. त्यातील दमदार गाणी, जबराट डान्स आणि खतरनाक डायलॉगनी लोकांची मने जिंकली. त्यामुळे दीड महिना उलटल्यानंतरही पुष्पाची जादू काही कमी झाली नाही. सोशल मीडियावर पुष्पाच्या अनेक रिल्स व्हायरल होत आहेत. परंतु एका नवरदेवाने (Bridegroom) आपल्या लग्नात केलेल्या पुष्पाच्या नक्कलीचा व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल (Viral) होत आहे. (bridegroom's dialogue of Pushpa Movie in wedding ceremony video goes Viral)

व्हायरल व्हिडीओमध्ये एका मंगल कार्यालयामध्ये विवाह चालू असल्याचं दिसत आहे. लग्नामध्ये वधू-वर एकमेकांना वरमाला घालण्याची विधी असते. परंतु या लग्नामध्ये अचानक नवरदेवाच्या अंगात अचानक पुष्पाचा संचार झाला आणि पाहुण्याराऊळांच्या गर्दीत या वराने चक्क वरमाला घालायला नकार दिला. नवरदेवाची ही कृती पाहून सगळेच भांबावले. तेवढ्यात नवरदेवाने पुष्पा सिनेमातील अल्लू अर्जूनप्रमाणे आपल्या हनुवटीखालून पुष्पा स्टाईलने हात फिरवला. थोडक्यात काय तर तो नवरीला सांगत होता की, मै झुकेगा नही साला."

दरम्यान नवरदेवाचा "मैं झुकेगा नही..."चा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 'new.flower.decoration' या इन्स्टाग्राम (Instagram) अकाउंटवरून पोस्ट केलेल्या या व्हिडीओवर लाईक आणि कमेंटचा पाऊस पडत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT