Brutal murder of a Hindu boy for falling in love with a Muslim girl Brutal murder of a Hindu boy for falling in love with a Muslim girl
देश

मुस्लिम मुलीशी प्रेम केल्याने हिंदू मुलाची निर्घृण हत्या; तिघांना अटक

सकाळ डिजिटल टीम

एक २५ वर्षीय हिंदू तरुण मुस्लिम (Muslim) तरुणीच्या प्रेमात पडला. त्याने तिच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. यामुळे त्याची हत्या (murder) करण्यात आली. हत्येप्रकरणी मुलीच्या भावासह दोघांना अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर शांतता राखण्यासाठी अतिरिक्त फौजफाटा तैनात करावा लागल्याचे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ही घटना कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यात घडली. विजय कांबळे (२५, रा. भीमानगर ले-आउट, वाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर शहाबुद्दीन (१९), मुलीचा भाऊ आणि नवाज (१९) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. (Brutal murder of a Hindu boy for falling in love with a Muslim girl)

मिळालेल्या माहितीनुसार, विजय याला रेल्वे पुलाजवळ हल्लेखोरांनी घेरले होते. यावेळी त्यांच्यामध्ये वादावादी झाली. हाणामारी झाली असता हल्लेखोरांनी विजयला रक्तबंबाळ केले. काही वेळाने विजयचा मृत्यू झाला. विजय मुस्लिम (Muslim) तरुणीवर प्रेम (love) करीत होता. त्याला तिच्यासोबत लग्नही करायचे होते. मात्र, मुलीच्या कुटुंबीयांचा प्रेमाला विरोध होता, असे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

या प्रकरणी विजयच्या आईने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत मुलीचे वडील आणि भावाने मुलावर चाकूने वार केल्याचा आरोप केला आहे. आम्ही बसून बोलत होतो. काही वेळाने दोन लोक आमच्या समोर उभे राहिले. ते कोण आहेत हे आम्हाला कळले नाही. त्यांनी विजयवर हल्ला केला. त्याच्याकडे शस्त्रही होते. शस्त्राने त्यांनी विजयला अनेक वार केले (murder) आणि नंतर घटनास्थळावरून पळून गेले, असे विजयच्या मित्राने सांगितले.

मुलाला यापूर्वीही धमक्या

मुलीच्या भावाने विजयला यापूर्वीही धमक्या दिल्या आहेत. मुलीचा भाऊ दोघांसोबत घरी आला आणि मला माझ्या मुलाला बहिणीशी संबंध (love) संपवायला सांगा असा इशारा दिला होता. त्यावेळी मी खात्री दिली होती की माझा मुलगा त्याच्या बहिणीशी असलेले नाते संपवेल. मात्र, तसे झाले नाही आणि त्यांनी माझ्या मुलाची हत्या (murder) केली, असे विजयच्या आईने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: आयएएस झाले तरी आयुष्याची परवड थांबली नाही; तुकाराम मुंढे- कर्जबाजारी बापाचा निर्भीड पुत्र

Pargaon News : दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगावच्या पूर्व भागातील गारपिटीसह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Live Update: पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे प्रयत्न- ममता बॅनर्जी

Strait of Hormuz: 'होर्मुज'साठी ३५ देश एकत्र! ट्रम्प यांची दादागिरी चालणार नाही; ब्रिटनचा पुढाकार, तेल-गॅसचा पुरवठा होणार सुरळीत

SCROLL FOR NEXT