Kiren Rijiju CBI Statement  esakal
देश

CBI आता 'पिंजऱ्यातला पोपट' नाही; कायदा मंत्री रिजिजूंच वक्तव्य

सकाळ डिजिटल टीम

केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी रविवारी सीबीआय आता पिंजऱ्यातला पोपट (Caged Parrot) राहिला नाही असे वक्तव्य केले. सीबीआय (CBI) आता देशातील एक अग्रणी तपास संस्था झाली आहे जी आपले कर्तव्य पार पाडत आहे असे किरेन रिजिजू यांनी सांगितले. याचबरोबर त्यांनी दावा केला की एक वेळ अशी होती की सरकारमधील काही लोक सीबीआयच्या तपासात अडथळे निर्माण करत होते. रिजिजू पुढे म्हणाले की, आधी अधिकाऱ्यांना ज्या समस्यांना तोंड द्यावे लागत होते त्या समस्या आता अस्तित्वातच नाहीत.

रिजिजूने रविवारी एक सोशल मीडिया पोस्ट केली, 'सीबीआय आता पिंजऱ्यात बंद असलेला पोपट नाही. आता सीबीआय भारताची एक सर्वोच्च तपास यंत्रणा म्हणून कार्यरत आहे.' या पोस्टबरोबरच त्यांनी शनिवारी सीबीआय अधिकाऱ्यांच्या पहिल्या संमेलनातील भाषणावेळचा एक छोटा व्हिडिओ देखील शेअर केला.

या भाषणात रिजिजूंनी सांगितले की, 'मला चांगले आठवते की एक वेळ अशी होती की सरकारमध्ये बसलेल्या व्यक्ती कोणत्याही क्षणी तपासात हस्तक्षेप करत होते. आज भारताला असा एक पंतप्रधान मिळाला आहे की जो स्वतः भ्रष्टाचाराच्या विरुद्ध उघडण्यात आलेल्या मोहिमेत प्रमुख भुमिका निभावत आहे.

केंद्रीय कायदा मंत्र्यांनी पुढे सांगितले की, 'ज्यावेळी सत्तेत बसलेले लोक भ्रष्टाचारात सामील असतात त्यावेळी त्यांना येणाऱ्या समस्या मी जाणतो. त्यावेळी त्यांच्या आदेशांचे पालन करणे अवघड असते. सीबीआयसाठी (Central Bureau Of Investigation) हा काळ अडचणींचा होता. त्यावेळी आम्हाला न्यायालयाकडून काही खोचक टिप्पणींचा सामना देखील करावा लागला होता. आता आम्ही एक मोठा प्रवास केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) 2013 मध्ये कोळसा घोटाळ्यावेळी सुनावणीदरम्यान सीबीआय एक बंद पिंजऱ्यातला पोपट असल्याची टिप्पणी केली होती. दरम्यान, सर्वोच्च न्यायलायाचे सरन्यायाधीश एन व्ही रमण (N.V. Raman) यांनी 1 एप्रिलला झालेल्या सीबीआय स्थापना दिवसानिमित्त बोलताना म्हणाले होते की गेल्या काही काळापासून अनेक प्रकरणात सीबीआयलाच्या कारवाईवर आणि निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. त्यामुळे तपास यंत्रणांची विश्वसनियता सार्वजनिक तपासाचा विषय झाली आहे. रमण यांनी वेगवेगळ्या तपास यंत्रणांना एका छताखाली आणण्यासाठी एक स्वतंत्र संस्था स्थापन करण्याचे आवाहन केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train AI Fake Tickets : मुंबई लोकल ट्रेनसाठी ‘AI’द्वारे बनावट तिकिटे तयार करणाऱ्यांना होवू शकते पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

Crime: डोळे काढले, शरीरावर १५० जखमा अन्...; १४ वर्षीय प्रेयसीसोबत भयंकर कृत्य, ४८ वर्षीय प्रियकराने क्रूरतेच्या मर्यादा ओलांडल्या

IND vs SA: 'ऋतुराजला एका अपयशामुळे टीम इंडियातून काढू नका, मी हात जोडले...', माजी क्रिकेटरची विनंती

Army Jawan : देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या जवानाचा यथोचित सन्मान; सैनिकाच्या 'त्या' कृतीने जिंकली मने, असं काय केलं?

PMC Hoarding Fee : होर्डिंग शुल्क दरवाढीचा ठराव शासनाकडून रद्द; महापालिकेला मोठा झटका!

SCROLL FOR NEXT