14-Yr-Old minor accused of sexual assault and murder of 3-year-old girl in Bilaspur  Esakal
देश

Crime News: 3 वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करुन हत्या! 14 वर्षांच्या मुलाचं धक्कादायक कृत्य..

Crime News: एका 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलाने 3 वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Crime News: एका 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलाने 3 वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्तीसगडमधील बिलासपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्या वयात मुलं खेळत बागडत असतात, त्याच वयात एका 14 वर्षाच्या मुलाने तीन वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केली. ही घटना खूपच धक्कायक आहे. यावर कोणाचाही विश्वास बसत नाही. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

छत्तीसगडच्या बिलासपूर जिल्ह्यात तीन वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी १४ वर्षीय मुलाला अटक केली आहे. या घटनेची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेबाबत, बिलासपूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक रजनीश सिंह यांनी सांगितले की, पोलिसांनी रविवारी सिरगीट्टी पोलिस स्टेशन परिसरात एका तीन वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार आणि हत्येच्या आरोपाखाली एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलाला अटक केली आहे.

मुलाच्या काकांवर गुन्हा दाखल

पोलिसांनी गुन्ह्याची माहिती लपवल्याबद्दल मुलाच्या काकाविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की, त्यांची तीन वर्षांची मुलगी काल सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास खेळत असताना अचानक बेपत्ता झाली. याची तक्रार मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांत दिली असून नंतर त्यांनी मुलीचा शोध घेतला असता शेजारील मुलगाही गायब असल्याची माहिती मिळाली.

मुलीच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, तो मुलगा नंतर बाथरुममध्ये सापडला आणि मुलगीही जखमी अवस्थेत तेथे पडली होती. पोलिस अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, जेव्हा कुटुंबीय मुलीला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचले तेव्हा डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

मुलीच्या प्रायव्हेट पार्टवर खोल जखमेच्या खुणा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी मुलीच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात आले, त्यानुसार मुलीच्या प्रायव्हेट पार्टवर जखमांच्या खुणा होत्या. पोलिसांनी याप्रकरणी १४ वर्षीय मुलाला लैगिंक अत्याचार आणि हत्येच्या आरोपाखाली अटक केली असून गुन्ह्याची माहिती लपवल्याच्या आरोपावरून त्याच्या काकाला अटक केली आहे. सध्या याप्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Santosh Deshmukh Case: मारहाणीचे २३ व्हिडीओ अन् संतोष देशमुखांच्या पत्नी कोर्टाबाहेर धावल्या; वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर हायकोर्टात सुनावणी

Hadapsar Accident : पुणे–सोलापूर महामार्गावर भरधाव वाहनाची धडक; दोन वेगवेगळ्या अपघातांत दोन बळी

Pune Cyber Fraud : सायबर चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच दिवशी ११ गुन्ह्यांची नोंद; दोन कोटी १६ लाखांची ऑनलाइन लूट!

Ladki Bahin: लाडक्या बहिणींसाठी २०० कोटींची तरतूद; राज्यात १० मॉल उभे करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

US Birth Tourism: गर्भधारणेदरम्यान अमेरिकेत प्रवास करणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा! यूएस दूतावासाकडून व्हिसा रद्द करण्याचा इशारा, कारण काय?

SCROLL FOR NEXT