Chief Minister Yogi Adityanath arrested for threatening to blow up a bomb Chief Minister Yogi Adityanath arrested for threatening to blow up a bomb
देश

मुख्यमंत्री योगींना बॉम्बने उडवण्याची धमकी; आरोपीला अटक

सकाळ डिजिटल टीम

गोरखपूर : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. ‘लेडी डॉन’ नावाच्या ट्विटर अकाउंटवरून ४ फेब्रुवारी रोजी ट्विट करण्यात आले होते. या ट्विटमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना प्राणघातक हल्ल्याची धमकी देण्यात आली होती. धमकी देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. (Chief Minister Yogi Adityanath arrested for threatening to blow up a bomb)

मुख्यमंत्र्यांना (Yogi Adityanath) धमकी दिल्यानंतर गोरखपूरच्या ठाणे कॅन्टमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाच्या तपासात असे आढळून आले की ज्याने ट्विट करून धमकी दिली होती तो फिरोजाबादचा राहणारा सोनू नावाचा गुन्हेगार आहे. तसेच आग्रा तुरुंगात बंद आहे. या ट्विटमध्ये हापूर पोलिसांना टॅग करण्यात आले होते. ‘लेडी डॉन’ नावाच्या ट्विटर अकाउंटवरून मेरठ आणि लखनौमध्ये बॉम्बस्फोटाच्या (bomb blast) धमक्याही देण्यात आल्या होत्या.

ट्विटनंतर सर्वेलन्स टीम या प्रकरणाचा तपास करीत होती. निवडणुकीदरम्यान केलेल्या या ट्विटमध्ये एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी हे प्यादे आहेत, खरे लक्ष्य योगी आदित्यनाथ आहेत, असे लिहिले होते. भाजप नेत्यांच्या वाहनांवर आरडीएक्स हल्ला करणार आहे. लखनौ रेल्वे स्थानक आणि बसस्थानकावर बॉम्ब पेरण्याची आणि मेरठमध्ये दहा बॉम्बस्फोट (bomb blast) करणार असल्याचेही म्हटले होते.

हापूर पोलिस या ट्विटची चौकशी करीत होते. त्यानंतर काही वेळाने आणखी एक ट्विट करण्यात आले. ज्यामध्ये भीम आर्मीच्या प्रदेशाध्यक्ष सीमा सिंह यांना मानवी बॉम्बने उडवणार असल्याचे म्हटले होते. पाकिस्तानातून येणाऱ्या लोकांबाबतही वादग्रस्त वक्तव्य करण्यात आले. हे ट्विट नंतर हटवण्यात आले. पोलिस या प्रकरणाचा तपास करीत होते.

प्रकरणाच्या तपासात सोनू सिंग याने ही धमकी दिली असून, तो फिरोजाबादमधील सिरसागंज पोलिस ठाण्यातील अहमदपूरचा रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले आहे. सोनू सध्या आग्रा तुरुंगात आहे. या प्रकरणाबाबत त्याला आग्रा येथून गोरखपूर न्यायालयात ‘वॉरंट बी’अंतर्गत हजर करण्यात आले. तेथून त्याला रिमांडवर कारागृहात पाठवण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

What is Rudali Tradition? : देवेंद्र फडणवीसांकडून उद्धव ठाकरेंना 'रुदाली'ची उपमा; पण रुदाली म्हणजे कोण? काय आहे ही विचित्र परंपरा?

Thane News: शिवशाहीची धोकादायक अवस्था, व्हायरल व्हिडीओनंतर प्रशासनाला जाग, अधिकाऱ्यांची सारवासारव

Adani Group Investment : दिवाळखोरीतून जाणाऱ्या ‘या’ कंपनीवर अदानी ग्रुप तब्बल १२५००००००००००० रुपये लावण्यास तयार!

Dhule News : धुळे जिल्हा बँकेचा 'कमाल': पीककर्ज वाटपात उद्दिष्ट ओलांडले, राष्ट्रीयीकृत बँका पिछाडीवर

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

SCROLL FOR NEXT