child falls running car shocking video shared by ips officer 
देश

पालकांनो काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ पाहाच...

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: एका वेगात चाललेल्या मोटारीचा दरवाजा उघडून चिमुकला रस्त्यावर जोरात पडला. परंतु, पाठीमागील वाहनाने जोरात ब्रेक दाबल्यामुळे चिमुकल्याचे जीव वाचला आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मोटार चालवणाऱया पालकांनो हा व्हिडिओ पाहाच, अशा प्रतिक्रिया नेटिझन्स व्हिडिओ पाहिल्यानंतर देत आहेत.

चारचाकी वाहनामधून अनेकजण प्रवास करत असतात. परंतु, वाहनाचे चाईल्ड लॉक न लावल्यास काय होऊ शकते, हे व्हिडिओमधून पाहायला मिळते. संबंधित व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या वाहनामध्ये मुलं असेल तर काळजी घ्या, असे कळकळीचे आवाहन नेटिझन्स करत आहेत.

आयपीस अधिकारी पंकज नैन यांनी व्हिडिओ शेअर केला आहे. परंतु, हा व्हिडिओ कोणत्या भागातील आहे, हे समजू शकलेले नाही. व्हिडिओमध्ये भरधाव वेगाने जाणाऱ्या मोटारीतून मुलगा रस्त्यावर पडला. त्यावेळी मागून येणाऱ्या गाडीने जोरात ब्रेक दाबला. लहान मुलगा ज्या मोटारीतून पडला ती मोटार तत्काळ थांबली व एका व्यक्तीने लगेच पळत येऊन मुलाला उचलले. मुलाचे नशिब बलवत्तर होते, म्हणून त्याला दुखापत होऊ शकली नाही. पण, थोडासा बेजबाबदारपणा चिमुकल्यांच्या जीवावर बेतू शकतो. काळजाचा ठोका चुकवणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

आयपीएस पंकज नैन यांनी व्हिडिओ शेअर करताना म्हटले आहे की, 'मोटारीमध्ये लहान मुलं असताना चाइल्ड लॉक आणि चाइल्ड सिट खूप महत्वाचे आहे. सर्व दरवाजे नीट बंद झाले आहेत का बघा. चाइल्ड लॉक केल्याची खात्रीही करून घ्या. सर्वच मुलं या मुलासारखी लकी नसतात.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIRAL VIDEO: “गलत करते हो यार…” रोहित शर्मा संतापला; चिमुकलीच्या सुरक्षिततेसाठी पुढे सरसावला, मुंबई विमानतळावर काय घडलं?

राम कपूर अन् साक्षी तंवर यांचा 'तो' बोल्ड सीन; पत्नी गौतमीला कानोकान नव्हती खबर, रात्री समजलं तेव्हा...

Railway News: रेल्वेच्या नियमांमध्ये मोठा बदल! मुलींना आरोग्य लाभ आणि प्रवास पास मिळणार, पण कोणत्या? जाणून घ्या...

Shikhar Dhawan : बांगलादेशमध्ये हिंदू महिलेवर सामूहिक बलात्काराच्या घटनेवर शिखर धवनचा संताप, म्हणाला..

Latest Marathi News Live Update: वार्ड क्रमांक ३४ मधील अपक्ष उमेदवार अरबाज अस्लम शेख यांच्यावर हल्ला

SCROLL FOR NEXT