Modi_Lalu_RahulGandhi
Modi_Lalu_RahulGandhi 
देश

Modi Ka Pariwar: राहुल गांधींमुळं सुरु झालं होतं 'चौकीदार' कॅम्पेन, आता लालूंमुळं 'मोदी का परिवार'; जाणून घ्या भाजपची रणनीती

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : भाजपनं निवडणुकीच्या तोडांवर एक आगळीवेगळी मोहिम सुरु केली आहे. भाजपच्या सर्व नेत्यांनी आपले ट्विटर बायो बदलले असून यामध्ये त्यांनी आपल्या नावापुढं 'मोदी का परिवार' असं लिहिलं आहे.

राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांच्या टीकेनंतर भाजपनं या कॅम्पेनाला सुरुवात केली आहे. असंच एक कॅम्पेन भाजपनं २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी चालवलं होतं, विशेष म्हणजे या कॅम्पेनला काँग्रेस खासदार राहुल गांधी कारणीभूत ठरले होते. (Chowkidar campaign started by Rahul Gandhi in 2019 now Modi Ka Pariwar is discussed by Lalu Yadav need to know BJP strategy)

नव्या कॅम्पेनला सुरुवात...

भाजपचे टॉपचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आपल्या ट्विटर हँडलच्या नावात 'मोदी का परिवार' असा बदल केला. त्यानंतर सोशल मीडियावसह माध्यमांमध्ये भाजपच्या या नव्या कॅम्पेनची चर्चा सुरु झाली. पण या कॅम्पेनलला कारणीभूत ठरले ते राजदचे नेते लालू प्रसाद यादव. यादव यांनी नुकतेच म्हटलं होतं की, "मोदींना आपलं स्वतः कुटुंब नाही" पण आता भाजपनं त्यांच्या याच विधानाचा समाचार घेत मोदींचा परिवार असं राजकीय कॅम्पेनच सुरु केलं आहे.

राहुल गांधींमुळं झालं चौकदीर कॅम्पेन

दरम्यान, २०१९ च्या निवडणुकीदरम्यान, राहुल गांधी यांनी 'चौकदीर चोर है' असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केला होता. त्यानंतर भाजपनं 'मै भी चौकदार हू' नावाच कॅम्पेन सुरु केलं. त्यानंतर राहुल गांधींच्या या विधनानाची बरीच चर्चा झाली. २०१४ च्या निवडणुकीत मोदींनी आपला स्वतः चा उल्लेख 'चौकीदार' असा केला होता होता. (Latest Marathi News)

यावेळी राफेल लढाऊ विमानांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी राहुल गांधींनी मोदींवर भ्रष्टाचारचे आरोप केले होते आणि देशाचा 'चौकीदारच चोर' आहे, असा आरोप मोदींवर केला होता. पण यानंतर मे २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांआधीच मोदींनी हे कॅम्पन लॉन्च केलं. त्यासाठी त्यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला ज्याला त्यांनी #MainBhuChowkidar असा हॅशटॅग वापरला होता. (Marathi Tajya Batmya)

'मोदी का परिवार' कॅम्पेनला कशी झाली सुरुवात?

'मोदी का परिवार' ही घोषणा ट्विटरच्या बायोमध्ये भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांनी ठेवली आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, ज्योतिरादित् शिंदे, पियूष गोयल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, विष्णूदेव साई आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत याचा सामावेश आहे.

मोदींनीही स्वतःच केला उद्घोष

दरम्यान, तेलंगाणाच्या अदिलाबाद इथं सभेला संबोधित करताना मोदींनी लालू प्रसाद यादवांच्या विधानाचा समाचार घेताना म्हटलं की, "देशाचे करोडो लोक मला त्यांच्या स्वतःच्या कुटुंबाचा भाग समजतात. देशातील १४० कोटी लोक मला त्यांच्या कुटुंबाचा भाग समजतात. ज्यांचं कोणी ही नाही त्यांचा मोदी आहे आणि मोदीचे ते आहेत," असंही मोदींनी आपल्या भाषणात म्हटलं. यानंतर लगेचच भाजपच्या नेत्यांनी आपलं ट्विटर बायो बदलले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

मोठी बातमी! हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा मृत्यू

Manipur Violence: मणिपूरमध्ये थरार! 2 तासांच्या चकमकीनंतर कुकी दहशतवाद्यांपासून 75 महिलांची सुटका

Loksabha Election : राज्यात आज अखेरचा टप्पा;मुंबई, नाशिकसह देशभरातील ४९ मतदारसंघांत मतदान

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: राजेश पाटलांनी केले मतदान

SCROLL FOR NEXT