comic kunal kamra jibe at arnab goswami says I got 6 months because he urinated in pants Air India urination case  
देश

Kunal Kamra on Airlines : विमानात लघुशंका प्रकरणावर कुणाल कामरा बोलला, "अर्णब तर चड्डीत..."

सकाळ डिजिटल टीम

Air India Urination incident : एअर इंडियाच्या न्यूयॉर्क-दिल्ली फ्लाइटदरम्यान एका प्रवाशाकडून एका वृध्द महिला प्रवाशावर लघवी केल्याचा प्रकार घडला. या लघवी करणाऱ्या प्रवाशावर एअर इंडियाकडून ३० दिवसांची बंदी घालण्यात आली आहे.दरम्यान स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने या शिक्षेची खिल्ली उडवणारं ट्विट केलं आहे.

कुणाल कामरा याच्यावर विमान प्रवासादरम्यान अर्नब गोस्वामी यांच्यासोबत वाद घातल्यावरून अनेक विमान कंपन्यानी बंदी घातली होती. त्या घटनेचा संदर्भ देत कुणाल कामराने टीएमसीच्या नेत्या महुआ मोइत्रा यांच्या ट्विटला उत्तर देताना विमान कंपन्यांना खोचक टोला लगावला आहे.

नेमकं काय झालं?

एअर इंडिया एअरलाइन्सने नोव्हेंबर 2022 मध्ये न्यूयॉर्क ते दिल्ली या फ्लाइटमध्ये प्रवास करणाऱ्या वृद्ध महिलेवर लघवी केल्याचा आरोप करणाऱ्या पुरुषावर 30 दिवसांची बंदी घातली आहे. त्यांच्या अधिकृत निवेदनात, एअरलाइन्सने म्हटले आहे की त्यांनी या घटनेची अतिशय गंभीर दखल घेतली आहे. दरम्यान या प्रकरणात राजकीय नेत्यांनी उडी घेतली आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांनी देखील या प्रकरणात ट्विट केलं.

हेही वाचा - ..तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड

महुआ मोईत्रा काय म्हणाल्या?

तृणमूल काँग्रेसचे खासदार महुआ मोईत्रा यांनी नागरी विमान वाहतूक नियामक संस्थेच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी ट्विट केले, "@DGCAIndia (नागरी विमान वाहतूक महासंचालनालय) च्या कार्यपद्धती बाबत मी संभ्रमात आहे, सह-प्रवाशाला प्रश्न विचारल्याबद्दल कुणाल कामरावर 6 महिन्यांसाठी बंदी घालण्यात आली होती, परंतु एअर इंडीया विमानात सह-प्रवाशावर लघवी करणाऱ्या आणखी एका व्यक्तीवर 30 दिवस बंदी घालण्यात आली .कुणाल… पुढच्या वेळी पद्धत बदलून पाहा? उघड आहे मोर इज लेस"

कामरा काय म्हणाला?

महुआ मोईत्रा यांच्या ट्विटला उत्तर देताना कामराने मझ्यावर सहा महिन्यांची बंदी घालण्यात आली जी ३ महिने कमी करण्यात आली कारण अर्णब चड्डीतच *** असं म्हटलं आहे. त्याने ट्विट केलं आहे की, "मला 6 महिने मिळाले जे कमी करून 3 महिने झाले कारण अर्णब त्याच्या पँटमध्ये *** होता"O

प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने काही दिवसांपूर्वी पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी विमान प्रवासादरम्यान काही प्रश्न विचारले होते. इंडिगोच्या फ्लाइटमध्ये घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कामराला तत्कालीन सरकारी एअर इंडियासह अनेक विमान कंपन्यांनी 'पुढील सूचना मिळेपर्यंत' विमान प्रवास करण्यास मनाई केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात सात दिवस धोक्याचे! पावसाबाबत मोठी अपडेट समोर, हवामान विभागाकडून इशारा जारी

Lawrence Bishnoi: वेळीच स्वतःला सुधारा नाहीतर...; लॉरेन्स बिश्नोई टोळीला उघड इशारा, धमकी देणारा रोहित गोदरा नेमका कोण?

IND vs AUS: पहिला वनडे सामना हरूनही कर्णधार शुभमन गिल समाधानी; कारण सांगताना म्हणाला, 'या मॅचने आम्हाला...'

Pune Cyber Fraud : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने पुण्यातील व्यावसायिकाची दीड कोटींची फसवणूक

Diwali Get-Together Recipes: दिवाळी गेट-टुगेदरची मजा आणि शान वाढवा खास दुधी-अलमंड-हनी हलवा आणि कुरकुरीत छोले-कबाबसह!

SCROLL FOR NEXT