Rajya Sabha Election 2022 esakal
देश

सोनियाजी, मी 'त्यांच्या' सांगण्यावरुन काँग्रेस प्रवेश केला, पण..; नगमा संतापल्या

सकाळ डिजिटल टीम

काँग्रेसनं राज्यसभेसाठी उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर अनेक काँग्रेस नेते पक्षाच्या हायकमांडवर नाराज आहेत.

रविवारी (29 मे 2022) काँग्रेसनं (Congress) राज्यसभेसाठी (Rajya Sabha Election 2022) 10 उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर अनेक काँग्रेस नेते पक्षाच्या हायकमांडवर नाराज आहेत. पक्षाचे प्रवक्ते पवन खेरा (Pawan Khera) यांनी रात्री 11 वाजता ट्विट करून आपली व्यथा मांडलीय. त्याचवेळी नगमा मोरारजी यांनीही राज्यसभेचं तिकीट न दिल्यामुळं नाराजी व्यक्त केलीय.

काँग्रेस नेते पवन खेरा यांनी आपल्या ट्विटमध्ये एवढंच लिहिलंय की, 'माझ्या तपश्चर्येत काहीतरी चुकलं असेल. हे ट्विट पाहून लोकांना वाटेल की, इथं तपस्या म्हणजे राज्यसभेसाठी केलेली मेहनत.' पवन खेरा यांना काँग्रेसचे सर्वोत्तम प्रवक्ते मानणाऱ्या रोहिणी सिंगही ही यादी पाहिल्यानंतर काँग्रेसवर नाराज झाल्या आहेत. त्या म्हणाल्या, पवन खेरा यांच्यापेक्षा प्रमोद तिवारींना प्राधान्य देण्यात आलंय. काँग्रेसचं काय चाललं? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.

त्याचवेळी भारतीय अभिनेत्री आणि काँग्रेस महिला नेत्या नगमा मोरारजी (Nagma Morarji) यांनीही पवन खेरा यांच्या ट्विटला उत्तर दिलंय. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलंय, 'कदाचित आमची तपश्चर्या इम्रान भाईसमोर 26 वर्षांपेक्षा कमी झाली असेल." यानंतर नगमा यांनी आज सकाळी पुन्हा ट्विट करत लिहिलंय की, सोनियाजी (Sonia Gandhi), आमच्या काँग्रेस अध्यक्षांनी मला एप्रिल 2003 मध्ये राज्यसभा घेण्याबाबत वैयक्तिकरित्या बोललं होतं. त्यांच्यामुळं मी काँग्रेसमध्ये आलो, तेव्हाही आम्ही सत्तेत नव्हतो. पण, त्यानंतर 18 वर्षे उलटूनही मला राज्यसभेवर पाठवण्याची संधी मिळालेली नाहीय. इम्रान प्रतापगढ़ी यांना राज्यसभेची जागा मिळालीय. या जागेसाठी आम्ही सक्षम नव्हतो का? असा सवाल त्यांनी केलाय.

काँग्रेसनं रविवारी जाहीर केलेल्या यादीत हरियाणातील अजय माकन, कर्नाटकातील जयराम रमेश, मध्य प्रदेशातील विवेक तंखा, छत्तीसगडमधील राजीव शुक्ला आणि रणजीत रंजन महाराष्ट्र, राजस्थानमधील इम्रान प्रतापगढ़ी यांची नावे आहेत. तामिळनाडूतील रणदीप सुरजेवाला, मुकुल वासनिक, प्रमोद तिवारी आणि पी चिदंबरम यांचा समावेश आहे. ही यादी पाहिल्यानंतर अनेक काँग्रेसजनांमध्ये नाराजी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : शिवसेना ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांनी मंत्री नितेश राणे यांना डिवचले

Lonar Lake Development: पर्यटकांना मिळणार लोणार सरोवराची वैज्ञानिक व ऐतिहासिक माहिती

Ichalkaranji : मला जगायचं नाही सोडा, महिला जीवनाला कंटाळून इचलकरंजी घाटावर गेली अन्...

Fake Currency: धाड परिसरात बनावट नोटा चलनात; पोलिस व बँक प्रशासनाकडून आवाहनः व्यापारी व नागरिकांन सतर्क राहावे

SCROLL FOR NEXT