Congress focuses on OBC card Congress focuses on OBC card
देश

काँग्रेसचे लक्ष ओबीसी कार्डवर; जात जनगणनेची मागणी करणार

सकाळ डिजिटल टीम

काँग्रेसच्या तीन दिवसीय चिंतन शिबिरात देशभरातील काँग्रेसचे (Congress) बडे नेते सहभागी झाले होते. चर्चेसाठी सहा गट तयार करण्यात आले होते. सर्वांच्या प्रस्तावांवर विचारमंथन केल्यानंतर काँग्रेस कार्यकारिणीने शिक्कामोर्तब केले आहे. बैठकीत यूपीए सरकारच्या कामगिरीचाही उल्लेख करण्यात आला. चिंतन शिबिरानंतर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्याचे मोदी सरकार मागास जातींकडे दुर्लक्ष करीत आहे. काँग्रेसने प्रथमच जात जनगणनेची बाजू मांडली आहे. यावरून काँग्रेस आता ओबीसी कार्डकडे (OBC card) पूर्ण लक्ष देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Congress focuses on OBC card)

यूपीए सरकारच्या काळात जातीवरून करण्यात आलेली जनगणना सध्याचे सरकार सार्वजनिक करण्यास तयार नाही, असे काँग्रेस (Congress) पक्षाच्या वतीने सांगण्यात आले. मागासलेल्या जातींना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवायचे आहे, हा त्यामागचा थेट उद्देश आहे. आता काँग्रेस जातींच्या जनगणनेचा (Caste will demand census) डेटा सार्वजनिक करण्यासाठी आणि मागसलेल्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी लढा देणार आहे.

काश्मीर ते कन्याकुमारी अशी ‘भारत जोडो’ यात्रा काढण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. ऑगस्ट महिन्यात ही मोहीम राबवण्यात येणार असल्याचे पक्षातर्फे सांगण्यात आले. या यात्रेचा संबंध महात्मा गांधींशी सांगितला आहे. खरे तर २०२२ मध्ये ‘भारत छोडो’ आंदोलनाला ८० वर्षे पूर्ण होत आहेत. महात्मा गांधींनी १९४२ मध्ये ही चळवळ सुरू केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : मुंबईत दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस सुरुच, रायगड, पालघरमध्ये शाळांना सुट्टी; रेड अलर्ट जारी, पुढील ४ दिवस धोक्याचे

पोलिस उपायुक्तांचे आदेश! ट्रॅफिक पोलिस नेमलेल्या ठिकाणीच असणे बंधनकारक; ‘HSRP’ नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर ‘आरटीओ’ करणार कारवाई; रिक्षा चालकांना ड्रेसकोडचे बंधन

चोरीचे दागिने घेणारा सराफही आरोपी! पावतीशिवाय दागिने घेतल्यास पोलिसांकडून कारवाई; ‘या’ कलमाखाली 3 वर्षांपर्यंत कारावास अन्‌ दंडाची शिक्षा, वाचा...

जिल्हा परिषदेच्या भन्नाट योजना! महिलांना शिलाई मशीन, पिठाची गिरणी; सातवी ते बारावीतील मुलींना सायकली, टॅली, MS-CIT, कराटे प्रशिक्षण, गरीब मुलांना पैसेही

Best Banana French Toast: बिझी मॉर्निंगसाठी बेस्ट! 10 मिनिटांत बनवा बनाना फ्रेंच टोस्ट; लिहून घ्या सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT