Rahul Gandhi News sakal
देश

'या' राज्यात काँग्रेसच्या अडचणी वाढल्या; राहुल गांधींसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना कोर्टाचं समन्स

भाजपची प्रतिमा मलिन करणाऱ्या जाहिरातींमध्ये खोटे दावे केल्याचा आरोप करणारी तक्रार दाखल केली होती.

सकाळ डिजिटल टीम

विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी (Assembly Election) प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत तत्कालीन विद्यमान भाजप सरकारने ‘४० टक्के भ्रष्टाचार’ केला आणि १.५ लाख कोटी रुपयांची लूट केल्याचा दावा केला होता.

बंगळूर : भाजपने काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi), मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah), उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटी (केपीसीसी) यांच्याविरोधात येथील अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयासमोर मानहानीची तक्रार दाखल केली आहे.

विशेष न्यायालयाने (Bangalore Court) केवळ निवडून आलेल्या माजी आणि विद्यमान खासदार-आमदारांशी संबंधित फौजदारी खटल्यांचा निपटारा करण्यासाठी विविध कलम अंतर्गत गुन्ह्यांची दखल घेतली. या संदर्भात सर्व प्रतिवादींना मंगळवारी समन्स बजावण्याचे आदेश दिले होते.

भाजपची प्रतिमा मलिन करणाऱ्या जाहिरातींमध्ये खोटे दावे केल्याचा आरोप करणारी खासगी तक्रार पक्षाचे राज्य सचिव एस. केशवप्रसाद यांनी ९ मे रोजी दाखल केली होती. तक्रारीनुसार केपीसीसीने पाच मे २०२३ रोजी प्रमुख वृत्तपत्रांमध्ये विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी (Assembly Election) प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत तत्कालीन विद्यमान भाजप सरकारने ‘४० टक्के भ्रष्टाचार’ केला आणि १.५ लाख कोटी रुपयांची लूट केल्याचा दावा केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT