Delhi High Court Esakal
देश

Delhi High Court: विचारपूर्वक शारिरीक संबंध ठेवल्यानंतर 'गैरसमजातून सहमती दिली' म्हणता येणार नाही; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Delhi High Court: लैंगिक शोषणाशी संबंधित एका प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान दिल्ली उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. न्यायालयाने आरोपी व्यक्तीवरील बलात्काराचा खटला फेटाळून लावला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Delhi High Court: लैंगिक शोषणाशी संबंधित एका प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान दिल्ली उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. न्यायालयाने आरोपी व्यक्तीवरील बलात्काराचा खटला फेटाळून लावला आहे. कोर्टाने यावेळी म्हटले की, जेव्हा एखादी महिला एखाद्या पुरुषासोबत शारीरिक संबंध ठेवते, तेव्हा तिची संमती गैरसमजावर आधारित आहे असे म्हणता येणार नाही.

दिल्ली उच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान सांगितले की, जेव्हा एखादी महिला एखाद्या पुरुषाशी विचार करून शारीरिक संबंध ठेवते तेव्हा तिची संमती गैरसमजावर आधारित आहे असे म्हणता येणार नाही, जोपर्यंत तिला लग्नाचे खोटे वचन दिल्याचा स्पष्ट पुरावा मिळत नाही.

न्यायमूर्ती अनूप कुमार मेंदीरत्ता यांच्या खंडपीठाने एका पुरुषावरील बलात्काराचा खटला रद्द करताना ही टिप्पणी केली आहे. दरम्यान, आरोपी आणि महिला यांच्यात हे प्रकरण सौहार्दपूर्णपणे सोडवण्यात आल्याचे खंडपीठाने मान्य केले आहे. या दोघांनी एकमेकांशी लग्न देखी केले आहे.

आरोपीने लग्नाच्या बहाण्याने वारंवार तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप महिलेने केला होता, घरच्यांनी त्याचे लग्न दुसऱ्यासोबत ठरवल्याचे सांगत त्या व्यक्तीने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. नंतर खंडपीठाला सांगण्यात आले की, या पुरुषाने आणि तक्रारदार महिलेने आपापसातील वाद मिटवला आणि कोर्टात लग्न केले.

तक्रारदाराने न्यायालयात सांगितले की, ती त्या व्यक्तीसोबत आनंदाने राहत होती. आरोपी त्याच्या कुटुंबाच्या विरोधामुळे लग्न करण्यास तयार नव्हता या चुकीच्या समजुतीमुळे तिने दाखल केलेल्या एफआयआर संदर्भात तिला पुढे जायचे नाही.

दिल्ली उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटले की, “जेव्हा एखादी स्त्री परिणाम पूर्णपणे समजून घेतल्यानंतर एखाद्या पुरुषाशी शारीरिक संबंध ठेवण्याचा निर्णय घेते, तेव्हा तिची संमती गैरसमजावर आधारित आहे असे म्हणता येणार नाही, , जोपर्यंत तिला लग्नाचे खोटे वचन दिल्याचा स्पष्ट पुरावा मिळत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT