Corona Update in India file photo
देश

देशात सक्रिय रुग्णसंख्या 16 लाखांच्या पार, पॉझिटिव्हिटी रेट वाढला

ओमकार वाबळे

भारतात गेल्या 24 तासात 2 लाख 58 हजार 89 कोरोना केसेसची नोंद झाली आहे. कालच्या तुलनेत 13,113 ने केसेस कमी झाल्या आहेत. तर, चोवीस तासात 385 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यासोबतच एक लाख 51 हजार 740 रुग्ण बरे झाले आहेत. (Indian Corona Cases toaday)

सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या 16 लाख 56 हजार 341 वर गेली आहे. तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट 119.65 टक्के झालाय. ओमिक्रॉनच्या रुग्णंसंख्येत वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. देशात 8 हजार 209 ओमिक्रॉन बाधितांची नोंद झाली आहे. (Omicron in india)

मुंबईला दिलासा तर महाराष्ट्रातील रुग्णसंख्या स्थिर

राज्यामध्ये एकूण 41,327 नवे रुग्ण आढळले आहेत. तर दुसरीकडे राज्यात आज 29 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.96 टक्के एवढा आहे. आज राज्यामध्ये 40386 रुग्ण बरे झाले आहेत. या नव्या रुग्णांसह आतापर्यंत एकूण 68,00,900 बरे झाले आहेत. यामुळे सध्या राज्याचा रिकव्हरी रेट 94.3 टक्के एवढा झाला आहे.

मुंबईतही दिलासादायक चित्र

मुंबईमध्ये एकूण ७ हजार ८९५ कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर ११ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याने दिलासा मिळाला आहे. काल मुंबईमध्ये आज 10,661 नव्या कोरोना बाधितांची (Corona Cases In Mumbai) नोंद करण्यात आली होती.

मुंबईत मागली आठवड्यात कोरोनाचा उद्रेक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. दिवसाला 20 हजारांच्या वर रुग्णसंख्या झाली होती. मात्र अचानक पॉझिटिव्ह होणऱ्यांची संख्या घसरल्याने तात्पुरता दिला मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT