coronavirus cleark suicide in meerut up 
देश

कोरोनाला घाबरून जीवन संपवत आहे; माझे पैसे...

वृत्तसंस्था

मेरठ (उत्तर प्रदेश): कोरोना व्हायरसला घाबरून एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना येथे घडली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने चिठ्ठी लिहून ठेवली असून, यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला आहे. कोरोनाच्या भीतीपोटी ऊस विकास परिषदेच्या (शेरमऊ) लिपिकाने  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना येथे घडली. आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली असून, त्यामध्ये म्हटले आहे की, 'मी, कोरोनापासून खूप घाबरलो आहे आणि मानसिक ताणतणावात आहे, माझा जीव संपवत आहे, माझे सर्व पैसे माझ्या पत्नीला देण्यात यावेत.'

दरम्यान, ऊस विकास परिषद शेरमऊ यांचे नकुड येथील बायपास स्थित सत्संग भवनाजवळ एक कार्यालय आहे. बुधवारी (ता. 1) रात्री आठ वाजेपर्यंत कार्यालय बंद झाले नव्हते. शेजारी राहणारे जितेंद्रने पाहिले तेंव्हा लिपिक असलेल्या आदेश सैनीचा मृतदेह लटकताना आढळून आला. त्यांनी तत्काळ पोलिसांना कळवल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊनशवविच्छेदन अहवालासाठी पाठवला असून, पुढील तपास करत आहेत.

कोतवाली प्रभारी सुशील सैनी यांनी सांगितले की, 'आदेश रामपूर मनिहाराण पोलिस ठाण्यातील शेरपूर गावचा होता. घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली आहे.  प्रथमदर्शनी त्यांनी आत्महत्या केल्याचे दिसत आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: पावसाने उघड केलं विकासाचं वास्तव! मुंबईत झाडं कोसळली, रस्ते वाहून गेले, मिसिंग लिंकवर खड्ड्यांचं साम्राज्य

Pune Flyover Work Stalled: कोरेगाव मूळ रेल्वे गेट क्र. ८ वरील बहुप्रतिक्षित उड्डाणपूलाचे काम भूसंपादन मोबदला न मिळाल्याने पुन्हा ठप्प

Latest Marathi Live Update : मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत

Education Crisis: अर्धापूरात ८४ शिक्षक बीएलओ कामात अडकले; दोन-दोन वर्गांवर एकच शिक्षक, विद्यार्थ्यांच्या शिक्षणहक्कावर गदा

रविवार ठरणार खास! आयुष्मान योगामुळे 2 राशींची लागणार लॉटरी; जाणून घ्या तुमचं भविष्य

SCROLL FOR NEXT