Coronavirus Confirm Cases Differs in NCDC And ICMRs Data Shows Difference of Patients 
देश

Coronavirus : केंद्र सरकारचा गोंधळ; कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत घोळ

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात येत असलेल्या आकडेवरीत तफावत असल्याचे आढळून आले आहे. यामुळे केंद्र सरकारचा सावळा गोंधळ समोर आला आहे. काल (ता. २६) रविवारी झालेल्या बैठकीत राज्य आरोग्य सचिवांसह राज्यभरातील कोरोना व्हायरस रुग्णांच्या आकडेवारीतील घोळ समोर आणण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांतील एनसीडीसी आणि आयसीएमआर यांनी नोंद केलेली आकडेवारी या बैठकीत सादर करण्यात आली. परंतु, एनसीडीसी आणि  आयसीएमआरकडून बैठकीत सादर करण्यात आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या आकडेवारीत मोठा फरक आढळून आला. कोरोना रुग्णांतील आकड्यांच्या या तफावतीमुळे हा गोंधळ समोर आला आहे.

Cornavirus : पुण्यात कोणत्या क्षेत्रिय कार्यालयात किती रुग्ण? तुमच्या भागात किती आहेत रुग्ण?

काल (ता. २६) सकाळी ०८ वाजेपर्यंत एनसीडीसीकडून भारतात एकूण २६४९६ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. तर ICMRकडून भारतात २७५८३ रुग्ण असल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे एनसीडीसी आणि आयसीएमआर या दोघांमधील आकड्यांमध्ये तब्बल १०८७ रुग्णांची तफावत आढळून आली आहे. या दोघांच्या आकड्यांमधील सर्वाधिक तफावत महाराष्ट्र, गुजरात आणि पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक आहे. आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात ८८४८, गुजरात ३८०९ आणि पश्चिम बंगालमध्ये ७७० रुग्ण आढळले असल्याचं सांगण्यात आलं. तर एनसीडीसीने दिलेल्या आकडेवारीत महाराष्ट्रात ७६२८, गुजरात ३०७१ आणि पश्चिम बंगालमध्ये ६११ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
 
दक्षिण कोरियाकडून किम जोंग उन यांच्या प्रकृतीबाबत मोठा खुलासा

दरम्यान, एनसीडीसी आणि आयसीएमआरमधील आकडेवारी केवळ आठ क्षेत्रांमध्ये जुळली असल्याचं समोर आलं आहे. ईशान्येकडील ०५ राज्यांसह, दादरा नगर हवेली, दमण-दिव आणि लक्षद्विप या केंद्रशासित प्रदेशातील आकडेवारी जुळली आहे. २१ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील एकूण कोरोना रुग्ण,  एनसीडीसीच्या आकडेवारीच्या तुलनेत, आयसीएमआरच्या आकडेवारीत अधिक आहे. २१ राज्यांमधील कोरोना रुग्णांच्या आकड्यांमधील सर्वाधिक तफावत महाराष्ट्रात असून, हा आकडा 1220 इतका आहे. तर सर्वात कमी नागालँडमध्ये केवळ एका रुग्णाची तफावत आढळली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: तुमचा अभिमान! शुभमन गिल पराभवानंतर काय म्हणाला? सामना नेमका कुठे फिरला हे सांगितलं, जसप्रीतबाबत...

Video: सर्वच सीमा ओलांडल्या! फेमस होण्यासाठी बाईकवर जोडप्याचं नको ते कृत्य, लोकांनी व्हिडिओ बनवून व्हायरल केला

IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराज दुर्दैवी पद्धतीने बाद झाला, रवींद्र जडेजा हतबल दिसला; इंग्लंड तिथेच जिंकला Video

Mhada Lottery: मुंबईकरांना म्हाडाकडून आनंदवार्ता! ५ हजारहून अधिक घरांची लॉटरी जाहीर; 'असा' करा अर्ज

ENG vs IND, 3rd Test: जडेजा लढला, पण इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी जिंकली! १९३ धावा करतानाही भारताची उडाली भंबेरी

SCROLL FOR NEXT