पुणे : कोरोना विषाणूच्या (coronavirus) संकटजन्य परिस्थितीतून सावरण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी आर्थिक पॅकेजची घोषणा केली. या घोषणेसोबतच चौथ्या टप्प्यातील लॉकडाउनचे संकेतही दिले. चौथ्या टप्प्यातील लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवारी) उच्च स्तरिय बैठक बोलवली आहे. या बैठकीत पुढील लॉकडाउनचा टप्प्यात कोणत्या गोष्टींवर कठोर निर्बंध ठेवावे लागतील. कोणत्या बाबींना सूट देणे शक्य होईल यासह अन्य काही बाबींवर सविस्तर चर्चा अपेक्षित आहे.
नरेंद्र मोदी यांनी 17 मे नंतरही लॉकडाउन (lockdown) कायम राहण्याचे संकेत देताना संकटातून सावरताना आर्थिक संकटात सापडण्याची खबरदारी घेतली जाईल, याचेही संकेत दिले आहेत. त्यामुळे चौथ्या टप्प्यात कोण-कोणत्या बाबींना शिथीलता मिळणार पाहणे महत्त्वाचे ठरेल.
लॉकडाउन 4 नव्या रुपात लागू केला जाईल असे खुद्द मोदींनी आपल्या भाषणात म्हटले होते. 18 मे पासून नव्या स्वरुपात लागू करण्यात येणाऱ्या लॉकडाउनमध्ये वेगवेगळ्या राज्यातील मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनांचा विचार केला जाण्याची शक्यता आहे. 18 मेपूर्वी यासंदर्भातील सविस्तर माहिती मिळेल, असे मोदींनी म्हटले होते. नव्या नियमानुसार लॉकडाउनमध्ये पुढील बदल दिसणे अपेक्षित आहे. मुद्देसुद्दपणे जाणून घेऊयात कसा असू शकतो चौथ्या लॉकडाउनचा टप्पा...
व्यापक सूट अपेक्षित
कोरोना विषाणूचे वाढते संक्रमण पाहता कोणताही धोका न पत्करता टप्प्याटप्याने लॉकडाउनमधून बाहेर पडण्याची व्यव्हू रचना आखण्यात येत असल्याचे दिसते. नव्या स्वरुपातील लॉकडाउनमध्ये पूर्वीच्या तुलनेत व्यापक स्वरुपात सूट देण्याचा विचार केंद्र सरकार करु शकते. कोरोनाच्या संकटातून सावरताना कोलमडणारी अर्थव्यवस्था पटरीवर आणण्याच्या उद्दशाने वेगवेगळ्या राज्यातील सूचनेनुसार पुढची पावले उचलली जातील.
राज्यांना दिले जाऊ शकतात अधिकार
राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार नव्या नियमांबाबत तरतूदी केल्या जातील, असे नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. त्यामुळे चौथ्या टप्प्यातील लॉकडाउनमध्ये कोणत्या गोष्टी खुल्या करण्यास परवानगी द्यावी आणि कोणत्या गोष्टींवरील निर्बंध कठोर ठेवावे याबाबतचे सर्व अधिकार राज्य सरकारला देण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. 15 मे पर्यंत प्रत्येक राज्याने लॉकडाउनसंदर्भात सूचना द्याव्या असे सांगण्यात आले आहे. वेगवेगळ्या झोनमधील परिस्थितीनुसार त्या भागात नेमका कोणता निर्णय घ्यावा यासंदर्भातील प्रस्ताव राज्यासमोर ठेवला जाऊ शकतो.
झोननुसार दिसू शकतील महत्त्वपूर्ण बदल
लॉकडाउनच्या आतापर्यंतच्या टप्प्यात प्राधान्यानुसार सूट देण्यात आल्याचे पाहायला मिळाले आहे. हळूहळू व्यापकता वाढवण्यातही आली. लॉकडाउनच्या तीन टप्प्यात वाढत गेलेली शिथीलता आणखी विस्तारित केली जाण्याची शक्यता दिसते. चौथ्या टप्प्यातील लॉकडाउनमध्ये केवळ रेड झोन, कन्टेटमेंट झोनमध्ये कठोर निर्बंध दिसू शकतात. एवढेच नाही तर अनेक रेड झोन ग्रीन किंवा ऑरेंज झोनमध्ये समाविष्ट केले जाऊ शकतात. रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन ठरविण्याचे सर्व अधिकार राज्य सरकारकडे मिळण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरच याबतचे संकेत दिले होते.
जगातील हे आहेत दानशूर; ज्यांनी दिली कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी मदत
जन-जीवन सुरळीत करण्यावर भर दिला जाऊ शकतो
लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात अनेक मर्यादित कर्मचाऱ्यांसह कार्यालये सुरु करण्यास परवनागी मिळाली होती. चौथ्या टप्प्यात यात आणखी वाढ करुन कामाचा वेग वाढवण्यावर भर दिला जाऊ शकतो.
रेल्वे सेवेसह अन्य वाहतूकही खुली केली जाऊ शकते
25 मार्चपासून पूर्णत: ठप्प असलेली रेल्वे सेवा तिसऱ्या टप्प्याच्या अखेरीस ठराविक मार्गांवर सुरु करण्यात आली होती. यात आणखी मार्गांचा समावेश करुन रेल्वे सेवा हळूहळू पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न देखील केला जाऊ शकतो. रेल्वेशिवाय रस्ते वाहतूक आणि देशांतर्गत विमानसेवा (Train, Air And Road Transport) सेवा सुरळीत करण्याच्या दृष्टिने सकारात्मकतेने काही बदल केले जाऊ शकतात.
24 मार्च पासून देशव्यापी लॉकडाउनची घोषणा करण्यात आली होती. 21 दिवसांनी 14 एप्रिलपर्यंत असणाऱ्या लॉकडाउनचा कालावधीमध्ये 19 दिवसांनी वाढवत तो 3 मे करण्यात आला. त्यानंतर पुन्हा दोन आठवड्यांची वाढ करण्यात आली असून 17 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाउनचा कालवधी संपणार आहे. त्यानंतर नव्या स्वरुपात लॉकडाउन कायम ठेवावा लागेल, असे मोदींनी स्पष्ट केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.