coronavirus lockdown beggar distributes rashan for 100 families at punjab 
देश

मनाने श्रीमंत असलेल्या भिकाऱयाची दानत मोठी...

वृत्तसंस्था

पठाणकोठ (पंजाब) : जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घालायला सुरवात केल्यापासून अनेकांवर बिकट परिस्थिती ओढावली आहे. पण, या परिस्थितीमध्ये एकमेकांना मदत करणे हीच खरी सेवा समजली जात आहे. एका भिकाऱयाने मनाची श्रीमंती दाखवून दिली आहे. या भिकाऱयावर परिसरासह सोशल मीडियातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

पठाणकोट परिसरात एक राजू नावाचा दिव्यांग भिकारी दिवसभर भिक मागून आपली गुजरान करतो. तीन पायाच्या सायकलवरून दिवसभर तो ठिकठिकाणी फिरत असतो. आपली गरज भागल्यानंतर उर्वरित पैसे शिल्लक ठेवले आहेत. पण, कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत अनेकजण समाजसेवेसाठी पुढे येत आहेत. राजूनेही समाजाकडून मिळालेले दान समाजासाठी खर्च करण्याचे ठरवले. राजूने शिल्लक असलेल्या पैशांमधून तब्बल 100 कुटुंबांना धान्य दिले असून, तीन हजार मास्कचे वाटप केले आहे.

राजूने यापूर्वीही मनाची श्रीमंती दाखवून दिली आहे. अनेक मुलांची शाळेची फी भरली आहे. शिवाय, गरीब मुलींच्या विवाहाची व्यवस्था करून ठेवली आहे. राजू म्हणाला, 'भिक मागून उरलेले पैसे साठवून ठेवतो. समाजाचे पैसे गोरगरिबांसाठी दान करतो. 22 मुलींच्या विवाहासाठी पैसे खर्च केले आहेत. यापुढेही गरीब मुलींच्या विवाहासाठी खर्च करणार आहे. उन्हाळ्यात अनेकांना प्यायला पाणी मिळत नाही, त्यावेळी सुद्धा पैसे खर्च करून पाण्याची व्यवस्था करतो.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pollution Control : 'नो पीयूसी... नो फ्युएल' उपक्रम प्रभावीपणे राबविणार : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

Latest Marathi News Updates Live: अमित साटम यांची ठाकरे बंधूंवर टीका: “महापालिकेच्या भीतीने एकत्र आले तरी पराभव ठरलेलाच”

PM Narendra Modi: पूराच्या वेदनेत दिलासा ठरली मोदींची भेट; निकिताच्या अश्रूंनी पंतप्रधानांचे मन हेलावले

Pitru Paksha 2025: पितरांची मृत्यू तिथी माहिती नाही? 'या' अमावास्येला करा श्राद्ध, मिळतील पूर्वजांचे आशीर्वाद

Nashik News : सुरक्षित अन्न खा, आरोग्य जपा; नाशिक ‘एफडीए’ची सणासुदीच्या काळात विशेष मोहीम

SCROLL FOR NEXT