coronavirus lockdown couple travel 1100 km on bicycle chennai to odisha 
देश

नवरा म्हणाला; सायकलवर फक्त व्यवस्थित बस...

वृत्तसंस्था

चेन्नईः जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घालायला सुरवात केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली. यामुळे अनेकजण विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. पण, काही दांपत्यानी 1100 किलोमीटरचा प्रवास सायकलवरून केला आहे.

चेन्नई ते ओडिशा हा 1100 किमीचा प्रवास सायकलवरून केला आहे. सात दिवस ते रात्रं-दिवस सायकल चालवायचे. 24 तासापैकी केवळ चार तास झोपत होते. या कालावधीमध्ये दोघेही केवळ बिस्कीट आणि भात खाऊन प्रवास करत होते. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, 'ओडिशामधील अशोक बेहरा (वय 36) आणि त्याची पत्नी चेन्नईमधील एका बांधकाम व्यवसायिकाकडे काम करत होते. लॉकडाऊनमुळे काम नसल्यामुळे त्यांनी घरी जाण्याचा निर्णय घेतला. सुरवातील 14 एप्रिलला लॉकडाउन संपेपर्यंत वाट पाहिली. पण, लॉकडाऊनचा कालावधी 3 मे पर्यंत वाढवण्यात आल्यामुळे आणि घरी मुले असल्यामुळे घरी जायचे ठरवले आणि सायकलवरून प्रवास सुरू केला.'

अशोक यांनी सांगितले की, 'आमचा प्रेम विवाह झाला आहे. तिने माझ्यासाठी तिच्या कुटुंबाला सोडले. त्यामुळे मी तिला होत असलेला त्रास पाहू शकत नव्हतो. लॉकडाऊन वाढल्यानंतर 14 एप्रिलला दुपारी आम्ही तीन वाजता प्रवास सुरु केला. सोबत मित्रही त्यांच्या पत्नींसह होते. प्रवासादरम्यान बिस्कीट, भात खाऊन दिवस काढले. दिवसातील फक्त चार तास झोपायचो. सात दिवस सायकल चालवल्यानंतर घरी पोहचलो. प्रवासादरम्यान नागरिकांनी आम्हाला खाण्यासाठी अन्नपदार्थ दिले. काहीजणांनी झोपण्यासाठी सुरक्षित जागा दिली. एका ठिकाणी पोलिसांनी भात आणि सांबार खाऊ घातले.'

अशोकची पत्नी नमिता म्हणाली, 'डोगंराळ भागांमधून प्रवास करावा लागला. पण, पतीने मला सायकवरून खाली उतरू दिले नाही. खूप कमी वेळा मी सायकलवरून खाली उतरले. अनेक ठिकाणी भाषेची अडचण आली. पोलिसांनी आडवले की ते काय बोलत आहेत हे समजत नव्हते त्यामुळे आम्ही रडायचो. मग, आम्हाला ते सोडून द्यायचे. घरी आल्यानंतर मुलांना पाहून खूप आनंद झाला.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup, IND vs UAE: ५ षटकार अन् ४ चौकार... भारताचा फक्त २७ चेंडूत विजय! युएईला दिला धोबीपछाड

Marathi Sahitya Sammelan : साताऱ्यातील संमेलनाला एक कोटी अतिरिक्त निधी, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा; बोधचिन्हाचे अनावरण

China: तिबेटप्रमाणे भूतानची जमीन हडपण्याची चीनची तयारी; आता 'या' नव्या जागेवरही दावा

Pune News : पुण्यातील खड्ड्यांची समस्या कायम, 'पीएमसी रोड मित्र' ॲपवर १२७४ तक्रारी

IND vs UAE: कुलदीप यादवच्या फिरकीला शिवम दुबेची साथ अन् युएई संघ ६० धावांच्या आत ऑलआऊट

SCROLL FOR NEXT