coronavirus situation patients need to give reference to get icu bed in covid hospital
coronavirus situation patients need to give reference to get icu bed in covid hospital 
देश

'ओळख असणाऱयांनाच मिळतो आयसीयू बेड'

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून, अनेकांना जीव गमवावा लागला आहे. काही देशांमध्ये कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येत असल्याचे पाहायला मिळते. पण, भारतात अद्यापही रुग्णांची संख्या वाढतानाच दिसत आहे. दुसरीकडे ओळख असणाऱया नागरिकांनाच आयसीयू बेड मिळत असल्याची माहिती एका सर्वेक्षणातून पुढे आली आहे. लोकलसर्कल या संस्थेने सर्वेक्षण केले आहे.

जगात कोरोनाच्या रुग्णसंख्येत भारत दुसऱया स्थानावर आला आहे. अनेक रुग्णांना बेड मिळत नसल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर लोकलसर्कल या संस्थेने सर्वेक्षण केले आहे. सर्वेक्षणादरम्यान ओळख असेल तरच आयसीयू बेड मिळू शकतो. शिवाय, देशभरात फक्त 4 टक्के रुग्णांना सरळ मार्गाने बेड उपलब्ध झाले आहेत, अशी माहिती पुढे आली आहे. भारतात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढत असल्याने आरोग्य व्यवस्थेवर ताण पडत आहे. भारतातील एकूण रुग्ण संख्या 55.6 लाखांच्या घरात गेली असून, गेल्या दोन आठवड्यांपासून दररोज 90 लाख रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे सर्वच रुग्णांना बेड उपलब्ध होऊ शकत नाहीत. आयसीयूमधील बेडचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत असून, ऑक्सिजन सिलिंडरचा पण तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे रुग्णांना बेड मिळत नसल्याने हे रुग्ण नक्की काय करतात याचे सर्वेक्षण लोकलसर्कल या संस्थेने केले.

सर्वेक्षणातून अशी माहिती पुढे आली की, कोरोना झालेले अनेक रुग्ण आपल्या नातेवाईकांमार्फत आणि आपल्या ओळखीचा उपयोग करून सरकारी हॉस्पिटल किंवा खासगी हॉस्पिटलमध्ये बेड मिळवत आहेत.  जवळपास 78 टक्के रुग्णांनी आपल्या ओळखीचा वापर करून बेड मिळवला आहे. देशात अनेक रुग्णांना बेड न मिळाल्याने प्राण गमवावे लागत आहेत. यावरून देशभरात किती भयंकर परीस्थिती आहे याचा अंदाज येतो. देशभरातील 211 जिल्ह्यांतील 17 000 जणांनी सहभाग नोंदवून कशा प्रकारे बेड मिळाले आहेत हे सांगितले. या 17 हजार जणांमध्ये 65 टक्के हे पुरुष होते तर 35 टक्के महिलांनी सहभाग घेतला होता. सध्या हा अहवाल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि प्रत्येक राज्याच्या आरोग्य सचिवांना पाठवण्यात आला आहे.

सर्वेक्षणादरम्यान 55 टक्के नागरिकांनी आपल्या ओळखीच्या कोणत्याही व्यक्तीला आयसीयू बेडची गरज पडली नसल्याचे सांगितले. 40 टक्के जणांनी आपण आपल्या ओळखीच्या लोकांच्या मदतीने बेड मिळवल्याचे सांगितले. सात टक्के लोकांनी आपण लाच देऊन बेड मिळवल्याचे या सर्व्हेदरम्यान सांगितले आहे. त्यामुळे भारतात कोरोनाच्या संकटात नागरिकांना किती मोठा संघर्ष करावा लागत आहे, हे दिसून आल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : धैर्यशील माने-सत्यजित पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री

Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

Uber Fake Fare Scam : चालक दाखवतायत खोटं भाडं, ग्राहकांची होतेय लूट.. उबरने दिला सावधान राहण्याचा इशारा!

MI Playoffs Chances : बुडत्या मुंबईचं थालाच्या चेन्नईकडे लक्ष! MI फॅन्स निराश होऊ नका... अजूनही होता येईल क्वालिफाय?

Delhi Liquor Scam: मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 15 मे पर्यंत वाढ

SCROLL FOR NEXT