Corona, Covid 19
Corona, Covid 19 
देश

चक्क रोबोट कोरोनाग्रस्तांच्या सेवेत; परदेशातला नव्हे हा देशातल्या रुग्णालयातील सीन

सुशांत जाधव

बडोदा: गुजरातमधील बडोदास्थित रुग्णालयात कोरोनाग्रस्तांच्या सेवेत चक्क रोबोटला उतरवल्याचे चित्र पाहायला मिळाले. सर सयाजीराव गायकवाड  (एसएसजी) रुग्णालय रोबोट कोरोनाग्रस्तांच्या सेवेत दाखल झाल्यामुळे चर्चेत आले आहे. या रुग्णालयात कोरोनाग्रस्तांना जेवण पुरवण्यासाठी खास रोबोटची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. रुग्णालयात दोन रोबोट ठेवण्यात आले आहेत. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या संक्रमणापासून दूर ठेवण्याच्या हेतून रुग्णालय प्रशासनाने ही खास व्यवस्था केली आहे. या रुग्णालयात उपचारासाठी असलेल्या रुग्णांना औषधे देणे त्यांना जेवण देणे यासारखी कामे रोबोटवर सोपवण्यात आली आहेत. रुग्णालयातील वार्डात असलेल्या प्रत्येक रुग्णांच्या बेडपर्यंत हा रोबोट अगदी सहजपणे जाताना दिसते. 

Video : पुण्यात व्हेंटिलेटरचा तुटवडा; 20 जणांची मृत्यूशी झुंज
 
एएनआयने यासंदर्भातील काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये रोबोट कोरोनाग्रस्तांना जेवण देताना तसेच त्यांना औषधे पुरवताना पाहायला मिळते. रुग्णालय प्रशासनाच्या या उपक्रमाची सर्वत्र चर्चा असून याला लोक दादही देत आहेत. सोशल मीडियावर देखील हे फोटो चांगलेच व्हायरल होताना दिसताहेत. यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. देशातील अन्य रुग्णालयात देखील अशी सुविधा असायला हवी, अशा आशयाच्या प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.  

चीनच्या वुहानमधून जगभरात पसरलेल्या कोरोनाने देशातही चांगलाच कहर माजवला आहे. दिवसागणिक देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध घालण्यात येत आहेत. लोकांनी सोशल डिस्टंन्सिगचे नियमाचे पालन करावे, अशा सूचना सरकार आणि प्रशासनाकडून देण्यात येत आहेत. कोरोना विरोधातील लढ्यात आरोग्य सेवेतील मंडळी जीवपणाला लावून सेवा देत आहेत. आरोग्य सेवा देणाऱ्या मंडळींनाकोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचीही दाट शक्यता आहे. या परिस्थितीत बडोदा रुग्णालयातील उपक्रम एक उत्तम उदाहरण आहे.    

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

Latest Marathi News Live Update: राजन विचारे उमेदवारी अर्ज दाखल करायला निघाले; ठाकरेंची उपस्थिती

Mumbai News: महाराष्ट्र दिनानिमित्त दादरसह परिसरातील वाहतुकीत बदल, वाचा महत्वाची बातमी 

Viral Video: रायफल्सच्या धाकाने ताब्यात घेत जाळली कार, वाचा न्यायाधीशाच्या अपहरण आणि सुटकेचा थरार

Crime News: इन्स्टाग्रामवर यौवना अन् प्रत्यक्षात समोर आली दुसरीच बाई.. अपेक्षाभंगामुळे तरुणाने केली बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT