Mobile Sakal
देश

Crime News : गर्लफ्रेंडच्या वडिलांचा फोन चोरला अन् थेट मुख्यमंत्र्यांनाच जीवे मारण्याची धमकी दिली; कारण...

हा फोन करणारा आरोपी केवळ १८ वर्षांचा आहे.

वैष्णवी कारंजकर

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ११२ वर कॉल करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. लखनौ पोलिसांनी मंगळवारी याआधी पोलिसांना आलेल्या धमकीच्या कॉलच्या संदर्भात एका व्यक्तीला अटक केली. या मागचं लव्ह कनेक्शन समोर आलं आहे.

उत्तर प्रदेशच्या ११२ या फोन नंबरवर आणि व्हॉट्सअॅप ग्रुपवर योगी आदित्यनाथ यांच्या जीवाला धोका असल्याचा फोन आला असून मेसेज पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपासही सुरू केला आहे. कॉल ट्रेस केल्यानंतर, लखनऊ पोलिसांनी फोन नंबर ज्याचा आहे त्या व्यक्तीशी संपर्क साधला.

त्याने सांगितलं की त्यांचा फोन दोन दिवसांपूर्वी चोरीला गेला होता. नंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितलं की, अमीन नावाच्या व्यक्तीने आपल्या मैत्रिणीच्या वडिलांना खोट्या प्रकरणात अडकवण्याचा कट रचला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ वर्षांचा अमिन हा त्याच्या मैत्रिणीच्या वडिलांच्या वागण्यामुळे वैतागला होता. तिचे वडील त्यांच्या नात्याच्या विरोधात होते.

रागाच्या भरात त्याने आपल्या मैत्रिणीचे वडील सज्जाद हुसेन यांचा फोन चोरला आणि त्याचा वापर करून मुख्यमंत्र्यांना धमक्या दिल्या. आरोपीवर फोन चोरी आणि इतर कठोर कलमे लावण्यात येणार असून त्याला बुधवारी लखनौ न्यायालयात हजर केले जाईल, असं पोलिसांनी सांगितलं.

"सीएम योगींना लवकरच मारणार," असा मेसेज अमीनने उत्तर प्रदेश पोलिसांना पाठवला आहे. मेसेज मिळाल्यानंतर पोलिसांनी एडीजी, कायदा आणि सुव्यवस्था आणि एडीजी इंटेलिजन्ससह वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. गेल्या काही दिवसांत सीएम योगी आदित्यनाथ यांना गुन्हेगारीबद्दल शून्य-सहिष्णुता धोरण आणि गुन्हेगारांच्या बेकायदेशीर मालमत्ता पाडण्यासाठी "ऑपरेशन बुलडोझर" मुळे अनेक धमक्या देण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack Video: पत्नीवर पिटबुलचा हल्ला, वाचवायला गेलेल्या पतीलाही चावा; दीड मिनिटात २६ वेळा चावले, हातासह पायावर सर्जरीची वेळ

Dagdusheth Ganpati Temple: ‘दगडूशेठ गणपती ट्रस्ट’ला फरासखाना ठाण्याची जागा मिळणार, पुणे पोलिसांकडून गृह विभागाकडे प्रस्ताव सादर

'वचन दिले तू मला' मालिकेतून अभिनेत्याची एक्झिट; मिलिंद गवळींनी शेअर केली खास पोस्ट ,म्हणाले- खूप त्रास

Shravan Calendar 2026: कॅलेंडर कशाला उघडताय? श्रावणातल्या सगळ्या सणांची यादी इथेच वाचा

Latest Marathi News Live Update : २०१८ च्या भागामध्ये कोणताही महत्त्वपूर्ण बदल झालेला नाही - सरन्यायाधीश

SCROLL FOR NEXT