Delhi Coporation Action on Jahangirpuri e sakal
देश

जहांगीरपुरीत बुलडोजर थांबला, महापालिकेची दंगलग्रस्त भागातील कारवाई स्थगित

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : हिंसाचार झालेल्या जहांगीरपुरी (Jahangirpuri Violence) येथे भाजपशासित महापालिकेकडून (Delhi Coporation) आज सकाळी साडेनऊ वाजतापासून बुलडोजर चालवले जात होते. येथील अतिक्रमणाविरोधात ही कारवाई असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे. इथं कुठलीही हिंसा घडू नये यासाठी ४०० पोलिस तैनात करण्यात आले आहेत. अखेर सुप्रीम कोर्टाने तत्काळ आदेश दिल्यानंतर हे बांधकाम थांबवण्यात आलं आहे.

जहांगरीपुरीत हनुमान जयंतीच्या दिवशी हिंसाचार झाला होता. या भागात जमावबंदी लागू असतानाच आज महापालिकेने मोठी कारवाई केली. दिल्ली भाजपचे अध्यक्ष आदेश गुप्ता यांनीही महापौरांना पत्र लिहून जहांगीरपुरीतील बेकायदेशीर बांधकामे काढण्याची मागणी केली होती. या पत्राची एक प्रत महापालिका आय़ुक्तांनाही पाठवण्यात आली आहे. त्यानंतर भाजपशासित महापालिकेने या भागात आज सकाळी साडेनऊ वाजतापासून बुलडोजरने घरे पाडण्यास सुरुवात केली होती. या कारवाईवरून आपने भाजपवर जोरदार टीका केली. तसेच औवेसी यांनी देखील भाजपचा समाचार घेतला.

ओवैसींची टीका -

भाजपने गरिबांच्या विरोधात युद्ध पुकारले आहे, असे ओवैसी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. अवैध धंदे हटवण्याच्या नावाखाली हे लोक उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश प्रमाणे दिल्लीतही गरीबांची घरे तोडत आहेत. या लोकांना नोटीसही देण्यात आली नाही. गरीब मुस्लिमांना शिक्षा दिली जात आहे. कारण त्यांनी जगण्याचे धाडस दाखवले आहे. या संपूर्ण प्रकरणावर अरविंद केजरीवाल यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असं ओवैसी म्हणाले.

यासोबतच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारचे पीडब्ल्यूडी विभाग या मोहिमेचा एक भाग आहे का? असा सवाल ओवैसी यांनी उपस्थित केला. जहांगीरपुरीच्या जनतेने त्यांना मतदान केले नाही का? ही कारवाई म्हणजे या लोकांचा विश्वासघात नाही का? हा सरकारचा भ्याडपणा आहे. पोलिस देखील गरीब जनतेच्या पाठिशी नाहीत, असंही ओवैसी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Phaltan Election Result: फलटणला रामराजेंचा ‘करेक्‍ट कार्यक्रम’; तीस वर्षांची एकहाती सत्ता उलथवत रणजितसिंह ठरले किंगमेकर!

Bike Helmet Tips: हेल्मेट घातल्यावर गुदमरल्यासारखे होतय? 'हे' 5 उपाय करतील मदत

Transformer Theft: लासगाव येथील विज वितरण कंपनीच्या सबस्टेशनवर चोरी

Malkapur Municipal Result: मलकापुरात पहिल्यांदाच कमळ फुलले; मनोहर शिंदेच निर्णायक, नगराध्यक्षपदासह मिळवल्या १९ जागा..

नवऱ्याला ८० हजार पगार, तरीही हुंड्यात मागतोय म्हैस; पत्नी तीन वर्षांपासून माहेरी, पोलिसांत जात नवऱ्याचे काळे कारनामे केले उघड

SCROLL FOR NEXT