Nirbhaya_Victims 
देश

निर्भया प्रकरण : दोषींचा मीडिया इंटरव्ह्यू होणार? तिहार जेल देणार निर्णय!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून वारंवार निर्भया प्रकरणातील दोषींची शिक्षा रद्द केली जात होती. न्यायव्यवस्था दोषींना इतकी सूट का देत आहे, याबाबत नागरिकांनी टीकेचा भडीमार केला होता. त्यानंतर अखेर निर्भया प्रकरणातील चारही दोषींना २० मार्च रोजी फाशी दिली जाणार असल्याचा निर्णय दिल्ली हाय कोर्टाने दिला. त्यानंतर आता आणखी एका वेगळ्या कारणामुळे या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे.

दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार आणि खूनप्रकरणी फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपींची मुलाखत घेण्याची मागणी करणाऱ्या माध्यम संस्थेच्या याचिकेवर विचार करण्याची सूचना दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी (ता.११) तिहार तुरुंग प्रशासनाला केली आहे.

माध्यम संस्थेने केलेल्या मागणी वर गुरुवारपर्यंत (ता.१२) आपला निर्णय देण्याचे आदेश न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणी मुकेशकुमार सिंह, पवनकुमार गुप्ता, विनय शर्मा आणि अक्षयकुमार सिंह या चौघांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. 

दरम्यान, या प्रकरणी दोषी ठरविण्यात आलेल्यांना कुठल्याही प्रकारे उत्तेजन देऊ नये अशी सूचना न्यायालयाने पाच मार्च रोजी माध्यम संस्थेला दिली होती. 

एका माध्यम संस्थेने चारही दोषींची मुलाखत घेण्याची परवानगी तिहार तुरुंगाच्या प्रशासनाकडे २५ फेब्रुवारी रोजी मागितली होती. भविष्यात अशा प्रकारचा गुन्हा करण्यास कोणी धजावू शकणार नाही, यासाठी या गुन्हेगारांची मुलाखत घ्यायची असल्याचा दावा संबंधित माध्यम संस्थेने केला होता. मात्र तिहार प्रशासनाने ही मागणी २७ फेब्रुवारी रोजी फेटाळून लावली होती. 

 - देशभरातील बातम्यांसाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune University: चला रे पोट्टेहो कुलगुरूंच्या घरी जेवायला... पुणे विद्यापीठात गॅस संपला? विद्यार्थ्यांचा इशारा! खानावळी बंद होणार?

MSRTC Recruitment: तरुणांना सरकारी नोकरी मिळणार, एसटीत १७,७४२ पदांची मेगाभरती; परिवहन मंत्र्यांचा प्रस्ताव सादर

'ऑपरेशन सिंदूर'ची खिल्ली ते शिखर धवनचं तोंड फोडण्याची इच्छा! Abrar Ahmed चे कारनामे माहित असूनही काव्या मारन अशी का वागली?

Mojtaba Khamenei : इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई कोमात ? पाय कापल्याच्या दाव्याने खळबळ

Tajmahal Name: ताजमहलचे नाव बदलणार? मोदी सरकारचा सर्वात मोठा खुलासा! संसदेत दिले थेट उत्तर

SCROLL FOR NEXT