Bus Accident Esakal
देश

Bus Accident: भरधाव बसमध्ये चालकाला हृदयविकाराचा झटका; मृत्यूपुर्वी वाचवले 65 प्रवाशांचे प्राण

Bus Accident: पश्चिम बंगालमधील बालासोरमध्ये चालत्या बसमध्ये बस चालकाला हृदयविकाराचा झटका आला. तो बेशुद्ध होण्यापूर्वीच त्याने बस बाजूला घेतली आणि 65 लोकांचे प्राण वाचवले.

अंकिता खाणे (Ankita Khane)

पश्चिम बंगालमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चालत्या बसमध्ये चालकाला हृदयविकाराचा झटका आला. अशा स्थितीतही चालकाने ब्रेक दाबला आणि बस रस्त्याच्या बाजुला घेतली त्यामुळे, बसमध्ये प्रवास करणाऱ्या ६५ जणांचे प्राण थोडक्यात बचावले. ही बस बालासोर जिल्ह्यातील निलगिरी भागात असलेल्या पंचलिंगेश्वरला जात होती. बसमध्ये सर्व भाविक होते.

मिळालेल्या माहितीनुसार, सर्व प्रवासी कोलकाता येथील होते. बालासोरमध्येच चालक एस.के अख्तर याला हृदयविकाराचा झटका आला. चालकाच्या छातीत तीव्र वेदना होऊ लागल्याने त्याने बस रस्त्याच्या कडेला थांबवली. यानंतर काही वेळातच तो बेशुद्ध झाला. प्रवाशांनी चालकाला निलगिरी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

तेथील एका गावकऱ्याने सांगितले की, जेव्हा बस अचानक थांबली तेव्हा त्याला वाटले की, ड्रायव्हरला शौचालयात जायचे आहे. पण जवळ गेल्यावर मला दिसले की, ड्रायव्हर बेशुद्ध पडला होता. ताबडतोब रुग्णवाहिका बोलावून त्याला रुग्णालयात नेण्यात आले. पण, आधीच चालकाचा मृत्यू झाला होता.

गेल्या आठवड्यात हरियाणातूनही अशीच एक घटना समोर आली होती. चालत्या बसमध्ये चालकाला हृदयविकाराचा झटका आला होता. बसचे नियंत्रण सुटल्याने कंडक्टर सावध झाला आणि त्याने शहाणपणा दाखवत लगेचच स्टेअरिंग पकडले. यानंतर बस बाजूला करण्यात आली आणि चालकाला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे चालकाचा जीवही वाचल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT