Priyanka Gandhi And BJP esakal
देश

'भाजप राज'मध्ये निवडणुकांच्या काळातच 'अच्छे दिन' : प्रियंका गांधी

मोदी सरकारकडे महागाई रोखण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही.

गणेश पिटेकर

नवी दिल्ली : सध्या निवडणुकांची प्रक्रिया सुरु आहे. येत्या मार्च महिन्यात उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांच्या विधानसभांचे निवडणूक निकाल जाहीर होणार आहे. लगेच पुढच्या महिन्यापासून घरगुती गॅस सिलिंडरचे दर महागणार असल्याची बातमी आली आहे. यावर काँग्रेस (Congress) नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी टीका केली आहे. त्या आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, भाजप (BJP) राजमध्ये निवडणुकांच्या काळातच 'अच्छे दिन'चा प्रत्यय येतो. निवडणुका संपताच महागाईचे दिवस जनतेसाठी डोकेदुखी ठरेल. एप्रिल महिन्यापासून घरगुती गॅसची किंमत दुप्पट होऊ शकते. तसेच पेट्रोल डिझेलचेही दर वाढतील. सरकारकडे महागाई रोखण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही, असा आरोप प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर केली आहे.

तसेच त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा (UPSC) देणाऱ्या तरुणाईचा प्रश्न उपस्थित केला आहे. आमचे सरकार युवा वर्गाचे ऐकत होते. या सरकारने त्यांचे ऐकणे सोडून दिले आहे. कोरोनामुळे यूपीएससीची तयारी करणाऱ्या युवा वर्गाचे मोठे नुकसान झाले. त्यांना आणखीन संधी देणे ही संवेदनशीलतेचे चिन्ह आहे आणि युवा वर्गाचा तो हक्कही आहे. सरकारने त्याचा जरुर विचार करायला हवा, असा सल्ला गांधी यांनी केंद्र सरकारला दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shreyas Iyer बरा होतोय...! ICU मधून बाहेर, वाचा काय आहेत नवे अपडेट्स

Aditya Thackeray: वोटचोरी अन् बोगस मतदान...; निर्धार मेळाव्यात आदित्य ठाकरेंचा 'राहुल गांधी पॅटर्न'! मतदार यादीवरून मोठे खुलासे

Uddhav Thackeray Statement : ''मुंबईत अ‍ॅनाकोंडा येऊन गेला अन् भूमिपूजन करून गेला, त्याला मुंबई गिळायची'' ; उद्धव ठाकरेंचं विधान!

Sonika Yadav Video: सात महिन्यांची गर्भवती जिद्दीने उभी राहिली! वेटलिफ्टिंग स्पर्धेत १४५ किलो भार उचलून जिंकले पदक

Swargate News : एसटीला ‘लाडकी बहिणच’ नकोशी! बससेवेत महिला आणि ज्येष्ठ नागरिकांवर भेदभाव

SCROLL FOR NEXT