Eat Dosa Win Prize Sakal
देश

डोसा खा अन् 71 हजार मिळवा! जाणून घ्या खास ऑफर

Eat Dosa Win Prize: एका रेस्तराँने आपल्या ग्राहकांसाठी ही ऑफर दिली आहे. या रेस्तराँमध्ये दिला जाणारा डोसा जर तुम्ही ४० मिनिटांत खाऊ शकला तर तुम्हाला 71000 रुपयांचे बक्षिस दिले जाते.

सकाळ डिजिटल टीम

Eat Dosa Win Prize: जर तुम्हाला डोसा (Dosa) खाण्याचे शौकीन असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. डोसा खाऊन तुम्ही तब्बल 71000 रुपये घरी घेऊन जाऊ शकता. दिल्लीतील एका रेस्तराँने आपल्या ग्राहकांसाठी ही ऑफर दिली आहे. या रेस्तराँमध्ये दिला जाणारा डोसा जर तुम्ही ४० मिनिटांत खाऊ शकला तर तुम्हाला 71000 रुपयांचे बक्षिस दिले जाते. या रेस्तराँच्या या अनोख्या ऑफरची सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून देशभर चर्चा होत आहे. (Eat Dosa and win a prize of Rs. 71000, a special offer at a restaurant in Delhi)

दिल्लीतील उत्तम नगरमधील 'स्वामी शक्ती सागर रेस्तराँ' नावाचे एक रेस्तराँ आहे. येथे ग्राहकांनी 'डोसा चॅलेंज' पूर्ण केल्यावर त्यांच्यासोबत 71,000 रुपयांचा जिंकण्याची संधी मिळत आहे. परंतू हा डोसा साधारण डोसा नाही, हा डोसा तब्बल 10 फूट लांबीचा आहे. हा डोसा तुम्हाला 40 मिनिटांत संपवायचा आहे. जर तुम्ही हा डोसा 40 मिनिटांत खाऊन संपवला तर 71000 रूपयांचे बक्षिस तुम्ही जिंकू शकता. रेस्तराँचे मालक शेखर कुमार यांनी सांगितले की, आमच्या रेस्तराँमधील हा 10 फूटांचा डोसा जो कोणी 40 मिनिटांत एकटा खाऊन पूर्ण करेल, त्याला आम्ही चेकच्या स्वरूपात 71,000 रुपये बक्षीस देऊ. पूर्वी हा डोसा छोट्या आकाराचा असे. मात्र आता तो अधिक मोठा आहे. पूर्वी ते ५ फूट, ६ फूट आणि ८ फूट आकाराचा डोसा बनवत असत. पण आता ते १० फुटाचा मोठा डोसा बनवतात.

आतापर्यंत 25 ते 26 लोकांनी हे आव्हान स्वीकारले. मात्र आजपर्यंत हे आव्हान कोणालाही जिंकता आलेले नाही. या चॅलेंजमध्ये सहभागी होण्यासाठी अनेक ठिकाणांहून कॉल येत असल्याचे मालक सांगतात. या 10 फूटाच्या डोसाची किंमत 1500 रुपये आहे. दरम्यान चॅलेंजमध्ये भाग घेतलेल्या एका ग्राहकाने सांगितले की, त्याने हे चॅलेंज स्वीकारले होते, परंतु तो डोसा पूर्ण खाऊ शकला नाही. परंतु हा डोसा अतिशय चवदार असल्याचे ग्राहकाने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND A vs AUS A : गौतम गंभीर आता काय करणार? इंग्लंड दौऱ्यावर ज्यांना नव्हती दिली संधी, त्यांची ऑस्ट्रेलियाविरुद्ध दमदार खेळी...

Latest Marathi News Updates : ठाकरेंच्या शिवसेनेकडून नाशिकमध्ये स्व.मीनाताई ठाकरे यांच्या फोटोला दुग्धभिषेक

खरंच जया यांच्यासोबत बिनसल्यामुळे ऐश्वर्या राय वेगळी राहात होती? लोकप्रिय दिग्दर्शक म्हणाले- ती आईच्या घरी जायची पण...

Smriti Mandhana चे ऑस्ट्रेलियाविरुद्ध घोंगावलं वादळ! शतक ठोकत केला मोठा पराक्रम; हरमनप्रीत-मिताली राहिल्यात खूप मागे

Nashik News : 'सेवा पंधरवडा' सुरू: नाशिक विभागात 'पाणंद रस्ते' आणि 'सर्वांसाठी घरे' उपक्रमाला गती!

SCROLL FOR NEXT