Viral Poster esakal
देश

Viral Poster: 20 रुपयांत पेट्रोल देईल! मला निवडून द्या..'या' सरपंचाच्या निवडणुकीचं पोस्टर व्हायरल

एका उमेदवाराच्या निवडणुकीचं पोस्टर सोशल मीडियावर चर्चेत आहे

सकाळ डिजिटल टीम

निवडणुकीच्या वेळेस अनेक नेता,लोकांना बरीच वचने देतात. काहीवेळेला नेते इतक्या वचनांचा पाऊस करतात कि जनतेला सुद्धा प्रश्न पडतो कि हे खरेच इतकी वचने पूर्ण करणार आहेत का? परंतु तरीदेखील अनेकदा हीच वचने नेत्यांना निवडणुकीत विजय मिळवून देतात. निवडणूक जिंको अथवा न जिंको पण उमेदवार मात्र नक्कीच चर्चेत असतात. अशाच एका उमेदवाराच्या निवडणुकीचं पोस्टर सोशल मीडियावर चर्चेत आहे.

या उमेदवाराच्या वचनांच्या यादीमुळे त्याचं पोस्टर इंटरनेटवर प्रसिद्ध झालं आहे. जेव्हा एका IPS अधिकाऱ्याने ही यादी बघितली तेव्हा त्यांनी मज्जेच्या स्वरात हे पोस्टर शेअर करत लिहिले की, मला या गावामध्ये स्थापित व्हायचं आहे ! या गोष्टीवर खूप लोकांनी टिका टिपण्या केल्या ज्यामध्ये सर्वसामान्य माणसापासून ते आईपीएस,आईएएस पर्यंत सगळे सहभागी होते.

या गजब पोस्टरचा फोटो भारतीय पोलिस सेवा (IPS) अधिकारी @arunbothra ने ९ ऑक्टोबर ला ट्विटरवर शेअर केला. त्यांनी गमतीदार ईमोजी सोबत कॅपशन मधे लिहले की, 'मी या गावामध्ये शिफ्ट होणार आहे. त्यांच्या या ट्वीटला ८ हजार हून अधिक लाईक्स आणि १ हजार हून जास्त रिट्वीट्स मिळाले आहेत. या लिस्ट मध्ये उमेदवाराने एकूण १३ वचन दिली आहेत. त्यामध्ये गावात ३ हवाईदल, मोफत वायफाय आणि महिलांसाठी मोफत मेकअप किट अशी काही वचनं दिली आहेत.

या व्हायरल पोस्टरवर सर्वात वर ' जय दादा खेडे़' असे लिहले असून नंतर सिर्साढ गावासाठी भावी उमेदवार- शिक्षित, मेहनती, झुझारु, इमानदार उमेदवार भाई जयकरण लठवाल यांनी काम केलंय आणि काम करणार, जनतेचा सम्मान करणार असे लिहले आहे.खाली त्यांनी वचनाची यादीही दिलेली आहे जी ते जिंकल्यावर पूर्ण करणार आहेत.

वाचा यादी

१. गावाच्या अड्ड्यावर रोज सरपंचांच्या वतीने मन की बात कार्यक्रम.

२. गावामध्ये ३ हवाईदल बांधले जाणार.

३. महिलांसाठी फुकट मेकअप किट.

४. सिरसाढ मध्ये पेट्रोल २० रुपये प्रति लिटर.

५. गॅस ची किंमत १०० रुपये प्रति सिलेंडर.

६. मेट्रो ही सिरसाढ़ पासून दिल्ली पर्यंत.

७. जीएसटी संपणार/ माफ

८. प्रत्येक परिवाराला एक मोटार मोफत

९. मोफत वायफाय सुविधा

१०. मद्यपींना रोज एक बाटली दारू मोफत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नगराध्यक्षांची निवड जनतेतूनच! दिवाळीतच वाजणार निवडणुकांचा बिगुल; पहिल्या टप्प्यात नगरपालिका किंवा झेडपी, पंचायत समित्यांची निवडणूक

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा हेल्दी एग रोल, पाहा रेसिपीचा Video

आजचे राशिभविष्य - 03 ऑक्टोबर 2025

अग्रलेख : अस्वस्थ स्वातंत्र्ययोद्धा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 03 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT