Gujarat Assembly Election esakal
देश

Gujarat Election : शानदार विजयानंतरही भाजप नेत्यांमध्ये नाराजी; पक्षातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर!

नेत्यांच्या नाराजीमुळं भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर येताना दिसत आहे.

सकाळ डिजिटल टीम

नेत्यांच्या नाराजीमुळं भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर येताना दिसत आहे.

अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीत (Gujarat Assembly Election) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मॅजिक पुन्हा चाललं असून, सलग सातव्यांदा इथं कमळ फुललं आहे. विधानसभेच्या 182 जागांपैकी भाजपला (BJP) दोन तृतीयांश पेक्षा जास्त विक्रमी 156 जागांवर विजय मिळाला आहे.

काँग्रेसला (Congress) 17 जागांवर समाधान मानावं लागलं. तर, आम आदमी पक्षाला केवळ 5 जागा मिळाल्या. दुसरीकडं दिल्ली महापालिकेपाठोपाठ हिमाचल प्रदेशमध्ये भाजपनं सत्ता गमावलीय. हिमाचलमध्ये 68 पैकी 40 जागा जिंकत काँग्रेसनं स्पष्ट बहुमत मिळवलं. इथं भाजपला 25 जागांपर्यंतच मजल मारता आली. मात्र, एकीकडं गुजरात विधानसभा निवडणुकीतील विजयाचा जल्लोष साजरा होत असतानाच, भाजपमध्ये नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे.

दरम्यान, नेत्यांच्या नाराजीमुळं भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर येताना दिसत आहे. माजी राज्यमंत्री नानू वनाणी (Nanu Vanani) यांनी खुलं पत्र लिहून पक्षातील कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. गुजरात भाजपमध्ये लहान कार्यकर्त्यांची काळजी घेणारं आता कोणीच नाहीये. मी सध्याच्या परिस्थितीबद्दल खूपच अस्वस्थ आहे, असं त्यांनी म्हटलंय.

वनाणी यांनी पत्रात पुढं लिहिलंय, '2022 च्या निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांचा जो उत्साह पाहिला, तो यापूर्वी कधीच अनुभवला नाही. पत्रात वनाणी यांनी कमी मतदानाबाबत, तसंच भाजपच्या कार्यपद्धतीवरही चिंता व्यक्त केलीय. पक्षानं आपल्या कार्यशैलीचा आढावा घेण्याची गरज आहे. पक्षात कागदावरच सगळा खेळ चालत आहे. मात्र, या कागदी अहवालांपेक्षा जमिनीवरील वास्तव फारच वेगळं आहे. पक्षाच्या जीवावर काही व्यक्ती खूप शक्तिशाली बनल्या आहेत. मात्र, पक्षानं त्यांना शरण जाणं चांगलं लक्षण नाहीये. कारण, यामुळं कार्यकर्त्यांचं मनोबल खचतं.'

भाजपच्या अन्य नेत्यांनीही असेच प्रश्न उपस्थित केले आहेत. कांकरेजमधून पराभूत झालेले कीर्तीसिंह वाघेला (Kirtisinh Vaghela) म्हणाले, 'स्थानिक नेत्यांनी पक्षाच्या विरोधात काम केल्यामुळं मला अपयश आलं. जे पक्षाचे सदस्य पंचायत निवडणुकीतही जिंकू शकत नाहीत, ते तिकिटांची मागणी करत होते. त्यांनी पक्षाच्या विरोधात काम केलं आणि आमचं नुकसान केलंय.' सोमनाथमधून पराभूत झालेले मानसिंह परमार (Mansinh Parmar) म्हणाले, 'काही देशद्रोही निघाले. त्यांना पक्ष माफ करणार नाही.' तर, पाटणमधून पराभूत झालेल्या राजुल देसाई यांनी स्थानिक नेते आणि पालिकेवर गंभीर आरोप केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT