farmer protest main.jpg 
देश

Farmer Protest: आंदोलनात जीव गमावणाऱ्यांसाठी शेतकऱ्यांकडून आज 'श्रद्धांजली दिवस'

सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली- नवीन कृषी कायद्याविरोधातील आंदोलनात जीव गमावणाऱ्या शेतकऱ्यांच्या स्मरणार्थ देशभरातील शेतकरी रविवारी (दि.20) 'श्रद्धांजली दिवस' पाळणार आहेत. यादरम्यान शेतकऱ्यांकडून प्रार्थना सभांचे आयोजन केले जाणार आहे. 

राजस्थान, गुजरात आणि हरियाणातील शेतकरी हरियाणा-राजस्थान सीमेवर मागील 7 दिवसांपासून ठाण मांडून बसले आहेत. मागील आठवड्यात रेवाडी पोलिसांनी त्यांना दिल्लीकडे जाण्यापासून रोखले होते. इतर ठिकाणांहूनही हजारो शेतकऱ्यांना दिल्लीत जाण्यापासून रोखले आहे. राजस्थानमधील अलवर येथील शहाजहांपूरजवळ जयसिंहपूरा-खेडा गावातील पत्रकार परिषदेदरम्यान एक शेतकरी नेते म्हणाले की, लाखो शेतकरी दिल्लीतील कडाक्याच्या थंडीतही रस्त्यावर ठाण मांडून बसले आहेत. ते थंडी आणि सरकारकडून निर्माण केल्या जात असलेल्या सर्व अडचणींचा सामना करत आहेत. कारण त्यांना आपले लक्ष्य प्राप्त करायचे आहे. हे तिनही कृषी कायदे मागे घेतले पाहिजे, हीच त्यांची एकमेव मागणी आहे. 

दिल्ली-जयपूर महामार्गावर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनी राजस्थामधील त्यांच्या शेतकरी बांधवांना त्यांच्या घरापासून आंदोलनस्थळी ने-आण करण्यासाठी खास बसची सोय केलेली आहे. ही मोफत बससेवा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आंदोलनस्थळी आणण्यासाठी महत्त्वाची ठरत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

दरम्यान, गेल्या 24 दिवसांपासून हरियाणा-दिल्लीच्या सिंघू सीमेवर शेतकरी नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. ऐन कडाक्याच्या थंडीतही हे शेतकरी आपल्या निश्चयापासून अजिबातच ढळलेले नाहीयेत. वेगवेगळ्या माध्यमातून हे आंदोलन सातत्याने चर्चेत येत आहे. याआधी या आंदोलनात डिजे ट्रॅक्टर आणला गेला होता. आंदोलक शेतकऱ्यांना उत्साहित करण्यासाठी म्हणून याचा वापर केला जात आहे. याचप्रकारे आता पंजाबमधील काही आंदोलकांनी सिंधू सीमेवर टॅटू काढून देणारा एक स्टॉल लावला आहे. आंदोलनस्थळी असलेल्या आंदोलकांना मोफत टॅटू काढून देण्याचं काम याठिकाणी होत आहे. या स्टॉलमधील एक आर्टिस्ट रविंद्र सिंह यांनी म्हटलं की, यामागील कल्पना अशी आहे की, आंदोलन करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे तसेच या आंदोलनाची आठवण म्हणून हे टॅटू काढण्यात येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

Latest Maharashtra News Updates : भाषेची सक्ती केल्यास आम्ही शक्ती दाखवू - उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

SCROLL FOR NEXT