father hears dead son heartbeats in a teddy bear video viral 
देश

Video: मृत मुलाच्या ह्रदयाचे ठोके ऐकून फुटला भावनांचा बांध

वृत्तसंस्था

न्यूयॉर्क: एका अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 16 वर्षीय मुलाच्या हृदयाचे ठोके ऐकल्यानंतर पित्याच्या भावनांचा बांध फुटला. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, कोट्यवधी नेटिझन्सनी व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. भावूक करणारा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांच्या डोळ्यांत पाणी येत आहे.

अमेरिकेतील केडेकोटा येथील जॉन रीड यांच्या 16 वर्षीय मुलाचा गेल्या वर्षी मोटार अपघातात मृत्यू झाला होता. मुलाचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी अवयव दान करण्याचा निर्णय घेतला होता. अवयव दानामुळे एका व्यक्तीला जीवदान मिळाले आहे. पण, ज्या व्यक्तीच्या शरीरात त्यांच्या मुलाचे अवयव प्रत्यारोपण करण्यात आले होते, त्या व्यक्तीने त्यांना टेडी बिअर भेट म्हणून पाठवला. या टेडी बिअरमध्ये त्यांच्या मुलाच्या हृदयाचे ठोके रेकॉर्ड करण्यात आले आहेत. टेडी बिअर पाहिल्यानंतर जॉन यांना रडू कोसळले. टेडी बिअर छातीला लावून जॉन आपल्या मुलाच्या हृदयाचे ठोके ऐकू लागल्यानंतर त्यांच्या भावनांचा बांध फुटला. व्हिडिओ रेकॉर्ड करत असलेल्या आपल्या पत्नीला त्यांनी व्हिडीओ थांबवण्याचा इशारा केला. वडील आणि मुलाचे नाते किती घट्ट आणि प्रेमाचे असेल हे व्हिडिओमधून पाहायला मिळते.

जॉन यांनी सांगितले की, 'दररोज रात्री तासन् तास टेडी बिअरला आपल्या छातीशी घेऊन मुलाच्या हृदयाचे ठोके ऐकतो.' रेक्स चॅपमन नावाच्या व्यक्तीने हा व्हिडिओ ट्विटरवरून व्हायरल केला आहे. काही कोट्यवधी नेटिझन्सनी हा व्हिडिओ पाहिला आहे. जॉन यांनी मुलाचे अवयव दान करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे कौतुक करत आहेत. अनेकांनी हा खूप हृदयस्पर्शी व्हिडिओ असल्याचे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi : 'ऑपरेशन सिंदूर' वेळी कॉंग्रेस पाकिस्तानच्या लष्कराच्या पाठिशी; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

१६ वर्षांच्या भावाला आणून द्या आणि सामना खेळवा; पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांचा भारत-पाकिस्तान मॅचला विरोध

Pune Traffic Update : पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी शास्त्रीनगर चौकात उपाययोजना; वाहतूक कोंडीवर तोडगा

Video : शुभांशु शुक्लांनी सांगितलं, अंतराळात व्यायाम कसा करतात? तशीच आसने पृथ्वीवर केल्यास शरीराला कोणते फायदे होतात, जाणून घ्या

Latest Marathi News Updates: सोलापुरातील होडगी रोडवर एका दुचाकीच्या शोरूम ला लागली आग

SCROLL FOR NEXT