Electric Wire Shock Dodwad Police Bailhongal esakal
देश

Belgaum Crime : विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने बापलेकाचा दुर्दैवी अंत; बैलहोंगलमधील घटनेने हळहळ

खांबावरील वीज तार तीन महिन्यांपूर्वी तुटून पडली होती.

सकाळ डिजिटल टीम

हेस्कॉमच्या कर्मचाऱ्यांनी तार पुन्हा जोडली होती. काल झालेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा खांबावरील तार तुटून खाली पडली.

बेळगाव : तुटून पडलेल्या वीज तारेला (Electric Wire) स्पर्श झाल्याने बापलेक ठार झाले. काल सकाळी ८.३० च्या सुमारास उडकेरी (ता. बैलहोंगल) येथे घटना घडली. प्रभाकर मलेशप्पा हुंबी (वय ६५) आणि मंजुनाथ प्रभाकर हुंबी (वय ३०, दोघे उडकेरी, ता. बैलहोंगल) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

घटनेची नोंद दोडवाड पोलिस (Dodwad Police) ठाण्यात झाली आहे. पोलिसातून समजलेली माहिती अशी, हुंगी यांच्या घरासमोर असलेल्या खांबावरील वीज तार तीन महिन्यांपूर्वी तुटून पडली होती. त्यावेळी हेस्कॉमच्या कर्मचाऱ्यांनी ही तार पुन्हा जोडली होती. काल झालेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा खांबावरील तार तुटून खाली पडली.

मात्र, त्याची कल्पना हुंबी कुटुंबीयांना आली नाही. काल सकाळी प्रभाकर हे खांबाशेजारी असलेले गवत आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी पडलेल्या तारेला त्यांनी स्पर्श केला. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. काही वेळानंतर मुलगा मंजुनाथच्या निदर्शनाची घटनाआली. त्यामुळे त्याने वडिलांना स्पर्श केला.

त्यावेळी त्याला विजेचा धक्का बसला ही घटना उघडकीस आल्यानंतर काहींनी जखमी अत्यव्यस्थ मंजुनाथला रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याचा उपचाराचा उपयोग न झाल्याने मंजुनाथचा काही वेळातच मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच दोडवाड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT