viral video sakal
देश

गणपती आगमनाच्यावेळी फायर स्टंट करणे पडले महागात! ज्वाळांनी वेढला तरुण, पहा थरारक Video

Video: गणपती आगमणाच्या वेळी तरुणाने केलेला स्टंट त्याला चांगलाच महागात पडला.

सकाळ डिजिटल टीम

सध्या सगळीकडे गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. मंगळवारी देशभरात बाप्पांचे उत्साहात आगमन झाले. प्रत्येकाने बाप्प्यांचे जल्लोषात स्वागत केले. पण असं म्हणतात कधी कधी अति उत्साह बरा नसतो. हो, उत्साहाच्या भरात आपण अनेकदा मोठ्या चुका करतो. सध्या एक असाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

सदर व्हिडिओ हा एका स्टंटचा आहे. गणपती आगमणाच्या वेळी तरुणाने केलेला स्टंट त्याला चांगलाच महागात पडला. (fire stunt accident in welcome ceremoney of ganpati or ganesha in surat video goes viral)

सध्या देशभरात बाप्पांचे उत्साहात आगमन करण्यात आले. गणपती आगमनाच्यावेळी अनेक मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येतात. सूरतच्या पर्वत पाटिया परिसरात अशाच एका कार्यक्रमात स्टंटबाजी करताना एक थरारक घटना घडली.

तरुण फायर स्टंट करताना त्याच्या चक्क शरीराला आग लागली. आजूबाजूचे लोक त्याला वाचवायला धावले पण त्याने वेळीच आपले शर्ट काढले आणि स्वत:ची सुटका केली. या संपुर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

हा व्हिडिओ पाहताच अंगावर काटा येतो. सध्या या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा सुरू असून नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. फायर स्टंट करताना किंवा गणपती उत्सवादरम्यान सावधगिरीने कोणतेही स्टंट करणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT