Farmer  sakal
देश

Farmer News : ‘ग्रीन वॉरियर’मुळे ४०० एकरवर जंगल; आदिवासी शेतकऱ्याची संपूर्ण गावाला प्रेरणा

दामोदर कश्यप असे या शेतकऱ्याचे नाव असून वनखात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले

सकाळ वृत्तसेवा

जगदलपूर : छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यातील ७४ वर्षीय आदिवासी शेतकऱ्याने निसर्ग संवर्धनाचा समुदायकेंद्रित दृष्टिकोन बाळगत आपल्या गावातील ४०० एकर जमिनीचे घनदाट जंगलात रुपांतर केले आहे. दामोदर कश्यप असे या शेतकऱ्याचे नाव असून वनखात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

कश्यप यांच्या प्रयत्नांमुळे केवळ त्यांच्या संघ करमरी या गावातच वनीकरण होण्यात मदत झाली नाही तर आसपासच्या गावांनाही यातून प्रेरणा मिळाली आहे. कश्यप यांनी आपल्या आदिवासी समुदायाला सहभागी करून घेत काही दशकांच्या प्रयत्नांनंतर या जंगलाची निर्मिती केली आहे.

‘पीटीआय’शी बोलताना कश्यप म्हणाले, की १९७० मध्ये बारावीनंतर मी जगदालपूरवरून माझ्या गावी परतलो. यावेळी, घराजवळच असलेल्या ३०० एकरवरील जंगलाचे मोठे नुकसान झाल्याचे पाहून मला धक्का बसला. एकेकाळी हिरवेगार असलेल्या या जंगलात केवळ काही वृक्षच उरले होते.

त्यामुळे अस्वस्थ होऊन जंगलाचे पुनरुज्जीवन करून गाव हरित करण्याचा निश्चय केला. मात्र, गावकरी उदरनिर्वाह किंवा दैनंदिन जीवनासाठी वृक्षतोड करत होते. त्यामुळे, सुरुवातीला गावकऱ्यांना वृक्षतोडीपासून परावृत्त करणे खूप कठीण होते. मात्र, हळूहळू त्यांना जंगलाचे महत्त्व समजू लागले, असेही त्यांनी नमूद केले.

कश्यप यांचा मुलगा तिलकरामनने सांगितले, की कश्यप यांची १९७७ मध्ये गावच्या सरपंचपदी निवड झाल्यानंतर त्यांनी जंगलाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. वृक्षतोड थांबविण्यासाठी कठोर कायदे लागू करण्यासह जंगलाचे नुकसान करणाऱ्यांना दंडही ठोठावला. आमच्या घराजवळील ३०० एकर जंगलाव्यतिरिक्त गावकऱ्यांच्या मदतीने दरवर्षी वृक्षारोपण करून माओलीकोट परिसरातही १०० एकर जंगल विकसित करण्यात आले.

प्रतिकूल परिस्थितीत समुदाय एकतेसाठी महत्त्वपूर्ण व चिरस्थायी बदल घडविल्याबद्दल कश्यप यांना पौल के फेयरबेंड पुरस्कारानेही गौरविण्यात आले. एवढेच नव्हे, तर वनसंवर्धनातील अमूल्य योगदानाबद्दल छत्तीसगड राज्य शिक्षण मंडळाने इयत्ता नववीच्या पुस्तकातही त्यांच्यावरील धड्याचा समावेश केला आहे. सध्या माझे वडील विविध प्रजातीच्या वृक्षांसाठी १० एकर जमिनीवर रोपवाटिका उभारत आहेत, असेही त्याने नमूद केले.

कश्यप यांच्या प्रयत्नांमुळे आपले गाव हिरवेगार झाल्याबद्दल व कडक उन्हाळ्यातही वातावरण थंड राहत असल्याबद्दल गावकरी कृतज्ञ आहेत.

थेंगा पाली यंत्रणा

बेकायदा वृक्षतोड थांबविण्यासाठी संघ कर्मारी गावच्या ग्रामपंचायतीने ‘थेंगा पाली’ यंत्रणा उभारली. या यंत्रणेतंर्गत जंगलात गस्त घालून जंगलाचे रक्षण करण्यासाठी दररोज तीन गावकऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. त्याचप्रमाणे, जंगलाचे रक्षण करण्यासाठी कश्यप यांनी स्थानिकांच्या श्रद्धा, प्रथांचाही वापर केला.

संघ करमरी गावच्या रहिवाशांनी दामोदर कश्यप यांच्या नेतृत्वाखाली केलेले वनीकरण पाहून आनंद झाला. गावकऱ्यांनी सामुदायिक प्रयत्नांतून सुमारे ४०० एकर जमिनीवर हिरवेगार जंगल उभारले आहे. त्याचा शेजारील गावांवरही सकारात्मक परिणाम झाला आहे.

- शहीद खान, मुख्य वनसंरक्षक, बस्तर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT