Tipu Sultan Siddaramaiah esakal
देश

Tipu Sultan : टिपू सुलतानचा पुतळा का बसवायचा नाही? काँग्रेसच्या बड्या नेत्यानं भाजपला चांगलंच सुनावलं

'भाजपनं आतापर्यंत नारायण गुरू, बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर टीका केली आहे.'

सकाळ डिजिटल टीम

'भाजपनं आतापर्यंत नारायण गुरू, बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर टीका केली आहे.'

कर्नाटकात टिपू सुलतानच्या पुतळ्यावरुन राजकारण चांगलंच तापलंय. काँग्रेस आमदाराविरुध्द भाजप आक्रमक झालेली पहायला मिळत आहे. यानंतर या वादात आता कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांनी उडी घेतलीय.

टिपू सुलतानचा पुतळा (Tipu Sultan Statue) का बसवता येत नाही, असा सवाल सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांनी केलाय. कर्नाटकातील काँग्रेस (Karnataka Congress) आमदार तन्वीर सैत (Tanveer Sait) यांनी टिपू सुलतानचा 100 फुटी पुतळा बसवणार असल्याचं जाहीर केलंय. मात्र, या प्रस्तावाला भाजपनं विरोध केलाय.

यावर सिद्धरामय्या म्हणाले, "टिपूचा पुतळा का बनवता येत नाही? त्यांना हा पुतळा बसवू द्यावा. भाजपनं आजपर्यंत इतिहासाचं विकृतीकरण केलं आहे. याआधीही भाजपनं नारायण गुरू, आंबेडकर आणि इतरांवरही टीका केली आहे. भाजप जनतेला खोट्या गोष्टी सांगून इतिहासाशी छेडछाड केली आहे, असा आरोप त्यांनी केलाय. दरम्यान, काँग्रेसचे आमदार तन्वीर सैत यांनी टिपू सुलतानचा 100 फुटी पुतळा बसवण्याची योजना आखली आहे. त्यानंतर भाजपनं टीका करायला सुरुवात केलीय. जो कोणी असं काम करेल, त्याला कायमचं घरी बसावं लागेल. कदाचित, आमदारकी किंवा विधानसभा सदस्यत्व गमावण्याचे संकेत भाजपनं (BJP) दिले आहेत. या प्रकरणी कर्नाटक विधानसभेतील विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनीही भाजपवर निशाणा साधायला सुरुवात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT