DB Chandregowda IndiraGandhi esakal
देश

D. B. Chandregowda : इंदिरा गांधींसाठी खासदारकीचा राजीनामा देणारे काँग्रेसचे माजी नेते डी. बी. चंद्रेगौडा यांचं निधन

चंद्रेगौडा यांनी नंतर जनता पक्षाकडून १९८३ मध्ये तीर्थहळ्ळी विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले.

सकाळ डिजिटल टीम

चंद्रेगौडा यांनी २००९ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला आणि बंगळूर उत्तरमधून लोकसभेची जागा जिंकली.

बंगळूर : माजी मंत्री व माजी सभापती डी. बी. चंद्रेगौडा (वय ८७) यांचे सोमवारी रात्री उशिरा त्यांच्या निवासस्थानी दरडहळ्ळी येथे निधन झाले. त्यांच्या (D. B. Chandregowda) मागे पत्नी आणि चार मुली असा परिवार आहे. आज, बुधवारी (ता. ८) त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

त्यांचा जन्म २६ ऑगस्ट १९३६ रोजी झाला. त्यांना ‘डीबीसी’ म्हणून ओळखले जात होते. कायद्याची पदवी घेतल्यानंतर त्यांनी वकिली सुरू केली. १९७१ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ते विधानसभा, विधान परिषद, लोकसभा आणि राज्यसभा सदस्य म्हणून निवडून आले.

इंदिरा गांधींच्या (Indira Gandhi) १९७७ मध्ये चिक्कमगळूरमधून लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी खासदारपदाचा राजीनामा दिला आणि त्यांच्या विजयासाठी काम केले. नंतर ते आमदार म्हणून निवडून आले आणि त्यांनी १९७९-८० पर्यंत पाटबंधारेमंत्री म्हणून काम केले. १९८०-८१ दरम्यान त्यांनी परिषदेत विरोधी पक्षनेते म्हणूनही काम केले होते.

चंद्रेगौडा यांनी नंतर जनता पक्षाकडून १९८३ मध्ये तीर्थहळ्ळी विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले. रामकृष्ण हेगडे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत, त्यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून काम केले होते आणि १९८६ मध्ये जनता पक्षाकडून राज्यसभेवर निवडून आले. १९८७ मध्ये त्यांनी तीर्थहळ्ळी मतदारसंघातून कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून दुसऱ्यांदा विजय मिळवला होता.

१९९९ ते २००४ दरम्यान कायदा आणि संसदीय कामकाज मंत्री म्हणून त्यांनी काम केले. चंद्रेगौडा यांनी २००९ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला आणि बंगळूर उत्तरमधून लोकसभेची जागा जिंकली. २०१४ पासून ते सक्रिय राजकारणापासून दूर होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Ayurvedic Kadha for Winter: थंडीमुळे सर्दी-खोकला आणि अंगही खाजतंय? 'हा' आयुर्वेदीक काढा आहे सुपर इफेक्टिव्ह!

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

Akola Crime : अल्पवयीन चोरट्याकडून २१.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त; घरफोडी प्रकरणाचा वेगवान उलगडा

SCROLL FOR NEXT