friend gave a funny gift to bride users will laugh after watching this viral video esakal
देश

नववधूला मिळालं लग्नाचं हे खास गिफ्ट! तुम्ही तर पाहातच राहाल

नेमके काय आहे या व्हिडीओत जाणून घेऊया.

सकाळ वृत्तसेवा

या व्हिडिओची जोरदार चर्चा सुरु असून यावर नेटकऱ्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे.

प्रत्येकाच्या आयुष्यात लग्न (Marriage) हे एक अविस्मरणीय क्षण असतो. यावेळी आयुष्यभराची साथ देण्याचं वचन वधू-वर एकमेकांना देतात. तसेच लग्नादिवशी वधू-वराला (Bride-Groom)आशिर्वाद देण्यासाठी त्यांचे नातेवाईक, प्रियजन, मित्र-मैत्रीणी शुत्रेच्छा देवून एखादं खास गिफ्ट भेट देतात. काहीवेळेस मित्र-मैत्रीणी गिफ्ट देताना काही हटके आणि मजेशीर गिफ्टवस्तू देतात, ज्यामुळे ते कायम आठवणीत राहील. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होतोय. या व्हिडिओची (Viral Video) जोरदार चर्चा सुरु असून यावर नेटकऱ्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे. नेमके काय आहे या व्हिडीओत जाणून घेऊया.

विवाह सोहळ्यामध्ये मित्र-मैत्रीणी काहीतरी हटके गिफ्ट (Gift) देतात आणि मजा उडवतात. सध्या सोशल मीडियात एका वधूला दिलेल्या गिफ्टची जोरदार चर्चा सुरु आहे. या वधूच्या मित्र-मैत्रीणींनी तिला एका मोठ्या बॉक्समधून गिफ्ट दिलंय आणि ते गिफ्ट स्टेजवरच उघडून पाहायला सांगितलं. वधूला दिलेलं गिफ्ट दिसायला तसं मोठ होतं, परंतु ते उघडण्यात तिला बरेच वेळ लागला. एका बॉक्समध्ये एकात एक असे अनेक बॉक्स होते. पण त्या बॉक्समधून शेवटी वधूच्या हातात जे काही लागलं ते पाहून वधूच्या चेहऱ्यावरचे हावभावच बदलून गेले. या बॉक्समध्ये फक्त सर्जिकल मास्क गिफ्ट म्हणून वधूला मिळालं आहे. हे असे गिफ्ट पाहून वधूलाही हसू अनावर झाले नाही. यावेळी उपस्थित असलेले पाहुणे मंडळी आणि मित्र-मंडळीही हसायला लागतात.

इंस्टाग्राम (Instagram) वर हा घंटा नावाच्या अकाऊंटवरून अपलोड करण्यात आले आहे. हा व्हिडीओ तब्बल 2 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केला आहे. सोशल मीडियामध्ये व्हायलर झालेल्या या व्हिडिओवर अनेक कमेंट्स आल्या आहेत. हा व्हिडिओ खूपच मजेशीर होता, परंतु अशा पद्धतीने कुणाच्या भावनांशी खेळू नये, असे एका युजरने म्हणले आहे. तर दुसऱ्या एका युजरने तुम्ही किती ही प्रयत्न करा पण मित्र कधीच सुधारत नाहीत, अशा बऱ्याच कमेंट्स या व्हिडिओवर आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs RCB WPL: 0,0,0,0,0,0,0,0,0,0,1,0! १२ चेंडूंत ११ निर्धाव! lauren bell ने दिला मुंबई इंडियन्सला जबर धाव; विकेटही घेतली अन्...

Pune News : एआय आणि डेटाच्या बळावर महाराष्ट्र होणार 'इनोव्हेशन हब'; डॉ. श्रीकांत पाटील यांनी मांडला रोडमॅप!

Latest Marathi News Live Update : भाजपचं हिंदुत्व हे चुनावी हिंदुत्व आहे का? - उद्धव ठाकरेंचा सवाल

Ayodhya Non-veg Ban: मोठी बातमी! अयोध्येत मांसाहारी पदार्थांच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी; उल्लंघन केल्यास..., का निर्णय घेतला?

Chandrapur Kidney Racket Case : ''निवडणुकीच्या कामाच्या व्यस्त असल्याने भेटीला येऊ शकलो नाही'', किडनी पीडितांना भेटताच पालकमंत्र्यांचं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT