Rekha Singh
Rekha Singh esakal
देश

कडक सॅल्यूट! देशासाठी शहीद झालेल्या पतीचं पत्नीनं स्वप्न केलं पूर्ण

सकाळ डिजिटल टीम

उच्चशिक्षित रेखा यांनी शिक्षिका होऊन समाजसेवा करण्याचं स्वप्न पाहिलं होतं; पण..

मध्य प्रदेशमधील (Madhya Pradesh) रीवा जिल्ह्यातील (Rewa District) फरेदा गावात राहणाऱ्या वीरचक्र पुरस्कारप्राप्त शहीद दीपक सिंह (Deepak Singh) यांच्या पत्नी रेखा सिंह (Rekha Singh) यांनी पतीचं स्वप्न पूर्ण करत सैन्यात लेफ्टनंट होण्याचा मान मिळवलाय. 28 मे पासून चेन्नईत त्यांचं प्रशिक्षण सुरू होणार आहे. पतीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि बहिणींना योग्य मार्ग दाखवण्यासाठी आपण सैन्यात आलो असल्याचं त्यांनी सांगितलंय. रेखाला पहिल्या प्रयत्नात यश मिळालं नाही. मात्र, तिनं निराश न होता दुसऱ्या प्रयत्नात तिची भारतीय लष्करात (Indian Army) लेफ्टनंट पदावर निवड झाली. 28 मे पासून ती चेन्नईमध्ये (Chennai) प्रशिक्षण घेईल, त्यानंतर ती सैन्यात सेवा करणार आहे.

लग्नापूर्वी रेखा सिंह जवाहर नवोदय विद्यालय सिरमौरमध्ये (Jawahar Navodaya Vidyalaya Sirmaur) शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. उच्चशिक्षित रेखा यांनी शिक्षिका होऊन समाजसेवा करण्याचं स्वप्न पाहिलं होतं. लग्नानंतर पती दीपक सिंह यांनी त्यांना सैन्यात अधिकारी होण्यासाठी प्रेरित केलं. पतीच्या हौतात्म्यानंतर रेखानं आपलं स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प केला. यामध्ये सासरच्या मंडळींनीही तिला साथ दिली. पतीच्या हौतात्म्यानंतर रेखा सिंह यांना मध्य प्रदेश सरकारनं शिक्षण कर्मचाऱ्यांच्या वर्ग दोनमध्ये नियुक्तीही दिली होती.

दरम्यान, रेखा सिंह यांना आपल्या पतीचं स्वप्न पूर्ण करायचं असल्यानं सैन्यात भरती होण्याची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी जिल्हा सैनिक कल्याण संघाच्या कार्यालयात जाऊन चर्चा केली. त्यानंतर त्यांना जिल्हा प्रशासन व सैनिक कल्याण संघाचे योग्य मार्गदर्शन आणि सहकार्य मिळालं. त्यानंतर रेखानं तयारी सुरू केली. नोएडा इथं जाऊन सैन्यात भरती होण्यासाठी प्रवेश परीक्षेचं प्रशिक्षण घेतलं. पहिल्या प्रयत्नात तिला यश मिळालं नाही, पण दुसऱ्या प्रयत्नात ती यशस्वी झाली आणि लेफ्टनंट बनलीय.

दीपक सिंह गलवान खोऱ्यात झाले शहीद

शहीद दीपक सिंह यांचा जन्म 15 जुलै 1989 रोजी रीवा येथील फरेदा गावात झाला होता. दीपकची 2012 मध्ये भारतीय लष्कराच्या बिहार रेजिमेंटमध्ये (Bihar Regiment) मेडिकल कॉर्प्समध्ये नर्सिंग असिस्टंट म्हणून भरती झाली होती. शहीद दीपक सिंह हे 15 जून 2020 ला लडाखच्या गलवान खोऱ्यात अचानक झालेल्या चिनी हल्ल्याला तोंड देताना शहीद झाले होते. शहीद नाईक दीपक सिंह हे नर्सिंग असिस्टंटचे कर्तव्य बजावत होते. हिंसक चकमकीत त्यांना गंभीर दुखापत देखील झाली होती, तरीही त्यांनी 30 सैनिकांचे प्राण वाचवले. दरम्यान, गलवानमधील हिंसक चकमकीदरम्यान जखमी होऊनही त्यांनी धैर्य दाखवलं. देशासाठी बलिदान दिल्याबद्दल शहीद दीपक सिंह यांना मरणोत्तर वीर चक्र प्रदान करण्यात आलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogi Adityanath : जगाला शांतता संदेश देणाऱ्या सनातन परंपरेचा काँग्रेसनं अपमान केलाय, त्याचं अस्तित्व नाकारलंय; योगींचा घणाघात

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 02 मे 2024

Sakal Podcast: शिर्डी मतदारसंघात काय होणार? ते तुरुंगातील नेत्यांना व्हर्च्युअल प्रचार करता येणार नाही

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT