girl escaped with her lover before marriage in meerut 
देश

लग्नाची बोलणी सुरू असतानाच तिने काढला पळ...

वृत्तसंस्था

मेरठ (उत्तर प्रदेश): घरामध्ये लग्नाची बोलणी सुरू असताना युवतीने प्रियकरासोबत पळ काढल्याची घटना घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, पोलिस युवतीचा शोध घेत आहेत.

मेरठ शहरामधील परतापूर भागामध्ये राहात असलेली युवती बीएससीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत आहे. कॉलेजमधील युवकासोबत तिचे प्रेमसंबंध असल्याची माहिती कुटुंबियांना समजली. यामुळे कुटुंबियांनी तिचे कॉलेजमध्ये जाणे बंद केले होते. शिवाय, नातेवाईकामध्ये विवाह जमवला होता. युवतीला पाहण्यासाठी मुलाकडील नातेवाईक युवतीच्या घरी आले होते. यावेळी युवती घरामध्येच होती. लग्नाची बोलणी सुरू होती. मुलीला बोलवा म्हटल्यानंतर तिचा शोध सुरू केला असता ती घरामध्ये नसल्याचे दिसून आले. तिचा शोध घेतला मात्र ती सापडली नाही. काही वेळानंतर तिचा मोबाईल लागला त्यावेळी तिने प्रियकरासोबत पळून गेल्याचे सांगितले. अखेर, मुलाकडील नातेवाईक परत गेले.

युवतीच्या कुटुंबियांनी मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली आहे. पोलिस अधिकारी आनंद कुमार मिश्रा यांनी सांगितले की, युवती बेपत्ता  असल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर शोध सुरू केला. युवतीने मोहकमपूर येथील आकाश नावाच्या प्रियकरासोबत पळून गेल्याचे सांगितले. पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपूरकरांना हवाई प्रवासाचा झटका; मुंबईसह अनेक शहरांची विमानसेवा दोन महिन्यांसाठी बंद, कारण काय?

IPL 2026 Final, RCB vs GT live: शुभमन गिलची विकेट अन् वाचला विराट कोहली-एबी डिव्हिलियर्सचा ऑल टाईम रेकॉर्ड...

Paithan Chowk Chaos: पाचोडमध्ये वाहतूक कोंडीचा कळस; आठवडी बाजाराच्या दिवशी पैठण चौक ठप्प, नागरिक हैराण

IPL 2026 Final, RCB vs GT live: चार आयपीएल फायनल खेळणाऱ्या बंगळुरूचा इतिहास नाही खास, गुजरात म्हणूनच आनंदी

SSC Marksheet Distribution: दहावीच्या विद्यार्थ्यांना सोमवारी गुणपत्रक व प्रमाणपत्र वाटप; सकाळी शाळांना, दुपारी विद्यार्थ्यांना वितरण

SCROLL FOR NEXT