Girl Student Physical Abused Sakal
देश

शिक्षकाचा मोठ्या बहिणीवर बलात्कार, धाकटीचा विनयभंग

सकाळ डिजिटल टीम

एका शारीरिक शिक्षणाच्या शिक्षकाने एका विद्यार्थिनीवर वारंवार बलात्कार (Girl Student Physical Abused), तर एकीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. या पीडित विद्यार्थिनी बहिणी असून धाकट्या बहिणीचा विनयभंग झाल्यानंतर मोठ्या बहिणीने मौन तोडले. त्यानंतर पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

राजस्थानमधील नागौर (Nagour Rajasthan) येथे २०१८ ते २०१९ दरम्यान ही घटना घडली आहे. हरी राम (३०) या शिक्षकाने विद्यार्थिनीला एका रिकाम्या वर्गात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. ती नवव्या वर्गात असताना ही घटना घडली होती. ती दहावीत गेल्यानंतरही याच शिक्षकाने तिच्यावर पुन्हा बलात्कार केला. त्यानंतर तिने घाबरून शाळा सोडण्याचा निर्णय घेतला. शाळा सोडल्यानंतर ती आई-वडिलांसोबत राहत होती. पण, याच शिक्षकाने गेल्या ५ मार्चला तिच्या लहान बहिणीचा विनयभंग केल्याची घटना घडली. लहान बहिणीने आई-वडिलांना तक्रार केली असता मोठीने मौन तोडले आणि तिच्यासोबत घडलेली हकीकत सांगितली. त्यानंतर कुटुंबीयांना धक्का बसला. त्यांनी लगेच पोलिस ठाण्यात धाव घेतली.

दोन्ही मुलींनी काकासह नागौरच्या पंचोरी पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. त्यानुसार शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दोन्ही मुलींचे जबाब देखील नोंदवण्यात येणार आहेत, असे पोलिस अधिकारी अब्दुल रौफ यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Satana : सटाणा अंधारातून प्रकाशाकडे नेणारा लोकनेता हरपला! देव मामलेदार यात्रेतील तो प्रसंग अन् दादांची तत्परता

मैत्री तुटली! अभिषेक बजाज आणि प्रणित मोरेनं एकमेकांना केलं अनफॉलो, 'हे' आहे मोठं कारण?

Latest Marathi News Live Update : पुण्यातील जलवाहिनी फुटलेली नाही; जोडणीचं काम सुरू – महापालिकेचं स्पष्टीकरण

खूप वाईट... जॉन अब्राहमचा चेहरा पाहून चाहते चकीत; अभिनेत्याला नेमकं झालंय तरी काय? म्हणतात-

Mobile Theft : आता मोबाईल चोरांची खैर नाही! स्वतः परत आणून देणार चोरलेला फोन; गुगलने आणलेले नवे Theft Protection फीचर्स पाहा

SCROLL FOR NEXT