girlfriend family brutally killed boyfriend at chhattisgarh 
देश

प्रियकराला शेवटचे मिठीत घेतले अन्...

वृत्तसंस्था

अमरोहा (उत्तर प्रदेश): प्रियकराला फोन करून भेटायला बोलावले. आम्ही दोघे जंगलात जाऊन गप्पा मारत बसलो. त्याला जवळ घेतल्यानंतर गळ्यात हात घातला. त्याच क्षणी त्याचा गळा आवळला गेला, अशी माहिती प्रेयसीने तपासादरम्यान पोलिसांना दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्ण कुमार व कोमलचे एकमेकांवर प्रेम होते. परंतु, कोमलच्या घरच्यांनी तिचा दुसऱया युवकासोबत विवाह ठरवला होता. कोमलने विवाह ठरल्यानंतर प्रेमसंबंध तोडले होते. परंतु, कृष्णा तिच्या संपर्कात होता. कोमलला आपण दोघे विवाह करू म्हणून पाठिमागे लागला होता. कोमलने याबाबत घरच्यांना सांगितले. कृष्णा कोमलच्या विवाहामध्ये अडसर ठरत असल्यामुळे तिच्या घरच्यांनी त्याचा काटा काढण्याचे ठरवले. कोमलने कृष्णाला फोन करून भेटायला बोलावले. दोघे जंगलामध्ये गप्पा मारत बसले होते. यावेळी ठरल्याप्रमाणे कोमलच्या वडीलासंह अन्य दोघांना कृष्णाचा गळा आवळला आणि खून केला. कृष्णाचा जीव गेल्यानंतर मृतदेहाला दगड बांधून एका तळ्यात फेकून दिला. परंतु, काही दिवसांनी फुगलेला मृतदेह दिसू लागल्यानंतर घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेण्यात आला होता. शवविच्छेदनाच्या आहावालानुसार गळा दाबून खून केल्याचे उघड झाले होते. तपासादरम्यान कोमलला बोलते केल्यानंतर खुनाचा उलगडा झाला.

दरम्यान, कृष्णाचा खून करण्यापूर्वी त्याचा मोबाईल फ्लाइट मोडवर टाकला. यामुळे लोकेशन मिळत नव्हते. परंतु, तपासाची दिशा निश्चित करण्यात आली. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''काहींना यात राजकारण करायचंय'', मराठा आरक्षणाच्या 'जीआर'वरुन मुख्यमंत्र्यांनी ओबीसी नेत्यांचे कान टोचले

Latest Marathi News Updates Live : प्रतिज्ञापत्रावरुन मराठ्यांना ओबीसीत टाकता येणार नाही - छगन भुजबळ

Explained: लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यास कोणती लक्षणे दिसतात अन् कोणते उपाय करावे? वाचा आयुर्वेद तज्ज्ञांचे मत

Nagpur News: नागपूरमधील यशवंतराव चव्हाण कॉलेजमध्ये विद्यार्थ्याने संपवले जीवन; मानसिक ताणाच्या मुद्द्यांवर चिंता व्यक्त

Income Tax Law: आता २० हजारांपेक्षा जास्त रोख रकमेचा व्यवहार महागात पडणार, आयकर विभागाचा नवीन नियम तुम्ही वाचलात का?

SCROLL FOR NEXT