corona Esakal
देश

गोव्यातून येणाऱ्या प्रवाशांसाठी कर्नाटक सरकारची नवी नियमावली

रस्ते विमान आणि रेल्वेमार्गाने येणाऱ्या सर्व प्रवाशांना ही सक्ती असणार

विनायक जाधव

बेळगाव : कर्नाटक (Karnataka) सरकारने गोव्यातून (Goa) येणाऱ्या प्रवाशांसाठी नवी नियमावली अखेर जाहीर केली आहे. गोवा राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना बेळगावात (Belguam) प्रवेश करण्यापूर्वी कोरोना निगेटिव्ह चाचणी अहवाल सादर करावा लागणार आहे. रस्ते विमान आणि रेल्वेमार्गाने येणाऱ्या सर्व प्रवाशांना ही सक्ती असणार आहे. राज्य आरोग्य खात्याने याबाबतचा आदेश बजावला आहे.

यापूर्वी महाराष्ट्र (Maharashtra)राज्यातून येणाऱ्यांना कोरोनाचा चाचणी अहवाल सक्तीचा करण्यात आला होता. तर गोव्यातून येणाऱ्यांना केवळ लसीच्या दोन डोसची सक्ती करण्यात आली होती. पण गोव्यात देखील कोरोना संसर्ग वाढला असल्याने तसेच कर्नाटकातून गोव्यात ये-जा करणाऱ्यांची संख्याही अधिक असल्याने सुधारित आदेश बजावत गोव्यातून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्याना देखील तपासणी अहवालाची सक्ती करण्यात आली आहे. कोरोना चाचणी अहवाल ७२ तासांपेक्षा जुना असू नये. अन्यथा तो ग्राह्य धरला जाणार नाही.

आरोग्य खात्याने गोव्यासंबंधी नवा आदेश बजावताना विमानसेवा कंपन्यानी बोर्डिंग पास देण्याआधी प्रवाशाकडे कोरोना चाचणी निगेटीव्ह अहवाल आहे का? हे पाहूनच बोर्डिंग पास देण्याची सूचना केली आहे. रेल्वे आणि बसमध्ये देखील हा चाचणी अहवाल दाखवावा लागणार असून, बेळगाव आणि कारवार जिल्ह्यात स्थापण्यात आलेल्या चेकपोस्टवर आणखी खबरदारी घेण्याची सूचना करण्यात आली आहे. बेळगाव जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढली असल्याने जिल्हा प्रशासनाने गोव्याकडे देखील आपली नजर वळविली होती. गोव्यातून प्रवेश करणाऱ्यांची माहिती घेत जात त्यांची देखील कोरोना तपासणी केली जात आहे.

गोव्यातून रोज बेळगाव आणि कारवारमध्ये रोज ये-जा करणारे व्यापारी, कर्मचारी, शाळा आणि महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील ही सक्ती करण्यात आली असून दर पंधरा दिवसातून एकदा त्यांना कोरोना चाचणी करून घ्यावी लागणार आहे. दरम्यान, डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पाच वर्षांखालील लहान मुले व तातडीची वैधकीय उपचारसाठी येणाऱ्या रुग्णांना या चाचणी अहवालाच्या सक्तीतुन वगळण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Crime : तुकाराम मुंढेंचा सर्वात मोठा दणका! संभाजीनगर शॉक; प्रसिद्ध 'आईच्या गावात' अन् 'यल्ला यल्ला' हॉटेलला टाळे

Women T20 World Cup : भारतीय संघात बदलाचे वारे; वर्ल्ड कप अपयशानंतर वेगवान हालचाली!

Latest Marathi News Live Update : रत्नागिरी-पावसाचा आजपासून तीन दिवस आँरेज अलर्ट

Petrol-Diesel Price: Nayara नंतर सरकारी कंपन्यांचे आजचे दर जाहीर! महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल आता किती रुपयांना?

Lohagad Fort : लोहगड किल्ल्याची बदनामी थांबवावी; स्थानिक नागरिकांसह शिवप्रेमींची मागणी

SCROLL FOR NEXT