इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने उदयपूर हत्या प्रकरणाला प्रोत्साहन देणाऱ्या, समर्थन देणाऱ्या सर्व प्रकारच्या सोशल मीडिया पोस्ट्स,फोटो आणि सगळ्या प्रकारचा कन्टेन्ट काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावरच्या अशा सर्व कन्टेन्टवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी मंत्रालयाने केली आहे. देशातली कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आणि देशात शांतता टिकवण्यासाठी हे पाऊल उचलल्याचं मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. (Social Media News)
मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला (Social Media Platforms) पाठवलेल्या नोटिसमध्ये हे म्हटलं आहे की , या हत्येच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओसह अनेक गोष्टी असं सूचित करतात की सोशल मीडिया अकाऊंट्सवरुन या हत्येचं समर्थन केलं जात आहे. सोशल मीडिया कंपन्यांनी अशा प्रकारचा कन्टेन्ट तात्काळ काढून टाकावा. या सूचनेद्वारे, तुम्हाला ताबडतोब हे सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत की तुमच्या सुरक्षेचा, विश्वासाच्या दायित्वाचा भाग म्हणून, तुम्ही मजकूर, ऑडिओ, व्हिडिओ, फोटो किंवा कोणत्याही स्वरुपातील कन्टेन्ट (Obscene Content) काढून टाकावा. सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या सर्व मजकूरावर कारवाई करावी.
उदयपूरमध्ये (Udaipur Murder Case) कन्हैय्यालाल नावाच्या एका टेलरचा मोहम्मद रियाझ, घोश मोहम्मद या दोघांनी खून केला. या टेलरने नुपूर शर्माने केलेल्या वक्तव्याच्या समर्थनार्थ विधान केलं होतं. या खुनाचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल करण्यात आला होता. त्याचबरोबर नुपूर शर्मा (Nupur Sharma) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती. या सगळ्या प्रकारानंतर देशात मोठ्या असंतोषाचं वातावरण आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.