Grenade attack in Srinagar
Grenade attack in Srinagar esakal
देश

जम्मू कश्मीरात दहशतवाद्यांचा पुन्हा ग्रेनेड हल्ला; 2 जवानांसह 5 जण जखमी

सकाळ डिजिटल टीम

श्रीनगरमधल्या रैनावाडी भागात दहशतवाद्यांनी एका चेक पॉईंटवर ग्रेनेड हल्ला केलाय.

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) श्रीनगरमधल्या रैनावाडी भागात बुधवारी रात्री उशिरा दहशतवाद्यांनी एका चेक पॉईंटवर ग्रेनेड हल्ला केलाय. यात केंद्रीय राखीव पोलीस दल (Central Reserve Police Force) आणि राज्य पोलीस दलाचा प्रत्येकी 1 जवान जखमी झालाय. हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी (Terrorists) घटनास्थळावरून पळ काढला असून त्यांना पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आलीय. श्रीनगरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक राकेश बलवाल (Police Rakesh Balwal) यांनी या घटनेला दुजोरा दिलाय.

श्रीनगरचे (Srinagar) एसएसपी राकेश बलवाल म्हणाले, 'रैनावाडीतील एका चेक पॉईंटवर दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात (Grenade Attacks) केंद्रीय राखीव पोलीस दलाचा एक जवान आणि जम्मू-काश्मीर पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. या हल्ल्यात आणखी तीन जण किरकोळ जखमी झाले असून यामध्ये 2 वाहतूक पोलीस कर्मचारी आणि एका दुचाकीस्वाराचा समावेश आहे. सध्या ते ठीक असून धोक्याबाहेर आहेत.'

या घटनेनंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून दहशतवाद्यांचा शोध सुरू केलाय. श्रीनगरमधील बेमिना परिसरात पोलिसांनी एका दहशतवाद्याला ग्रेनेडसह अटक केलीय. त्याची चौकशी सुरू असून त्याची ओळख जाहीर करण्यात आलेली नाहीय. गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये ग्रेनेड हल्ल्यांमध्ये वाढ झालीय. यापूर्वी उधमसिंह नगर जिल्हा न्यायालयाबाहेर झालेल्या स्फोटात काही लोक जखमी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT