groom confirmed corona positive marriage and both families quarantined punjab 
देश

नवरदेवाला कोरोना झाल्याचे समजले अन्...

वृत्तसंस्था

चंदिगड (पंजाब): विवाहाची तारीख जवळ येऊन ठेपली होती. अचानक नवरदेवाला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समजले आणि आरोग्य विभागाने सर्वांनाच क्वारंटाईन केले.

जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. कोरोनामुळे देशात लॉकडाऊन असताना त्याचा अनेकांना फटका बसताना दिसत आहेत. मोगा येथे कोरोनामुले विवाह समारंभ रद्द करण्यात आला आहे. बोहल्यावर चढण्यापूर्वीच नवरदेवाला कोरोना संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.

कोरोना बाधित नवरदेव हा फरीदकोट तर नवरी मोगा येथील आहे. एक महिन्यापूर्वी या दोघांचा साखरपुडा झाला होता. विवाह सोहळा आज (सोमवार) होणार होता. मात्र, काही दिवसांपूर्वीच मुलाला कोरोना झाल्याचे समजले. यामुळे विवाह सोहळा रद्द करावा लागला. आरोग्य विभागाने नवरदेव आणि नवरी यांच्या कुटुंबांना क्वारंटाईन केले आहे. नवरदेवाची प्रकृती सध्या स्थिर आहे.

दरम्यान, मोगा येथील परमानंद भागात रात्री उशिरा एका रुग्णवाहिकेमागे पोलिसांच्या अनेक गाड्या आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. मुलीच्या कुटुंबीयांना शोधण्यासाठी हा ताफा आल्याचे लक्षात आले. डॉक्टरांनी रात्रीच संर्व कुटुंबियांची तपासणी केली. यात कुटुंबाच्या कुठल्याही सदस्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली नाही. मात्र, त्यांना 14 दिवसांसाठी होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. शिवाय, पोलिसांनी त्यांच्या घराबाहेर एक नोटीसही लावली आहे. मुलीच्या कुटुंबाशी संबंधित असलेल्या आणखी एका कुटुंबालाही होम क्वारंटाईन कण्यात आले आहे कारण हे कुटुंबही साखरपुड्यात सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Edible Oil Rate : महागाईच्या होरपळीत खाद्यतेलाचाही ‘भडका’; वर्षभरात भाव १० ते १८ टक्क्यांनी वाढले; ग्राहकांना फटका

Chakan Road Work Issue : दिरंगाईच्या दलदलीत रुतले उद्योग! चाकण औद्योगिक वसाहतीतील कॉर्निंग-रोहकल जंक्शन मार्गाचे काम तीन वर्षांपासून ठप्प

Satyendra Jain: आप नेते सत्येंद्र जैन यांना अटक! एसीबीची मोठी कारवाई; अरविंद केजरीवाल यांचा भाजपवर संताप

Sanjay Shitole : जिद्दीच्या जोरावर कोकडेवाडीतील शेतकरीपुत्राचे यश; दुय्यम निबंधक या पदावर झाली निवड

ACB Crime : ‘एनओसी’साठी ६५ हजारांची मागणी; ३५ हजार घेताना उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT