grooms father and brides mother elope at gujrat 
देश

तरुणपणांचं प्रेम मुलांच्या विवाहापूर्वीच पळालं...

वृत्तसंस्था

सूरत (गुजरात): दोघांचे तरुणपणी एकमेकांवर प्रेम होते. परंतु, दोघांचा विवाह होऊ शकला नाही. दोघांनी एकमेकांच्या मुला-मुलीचा विवाह ठरवला. पण, विवाहापूर्वीच विहीण आणि व्याह्याने धूम ठोकल्याची घटना येथे घडली. दोघे पळून गेल्यामुळे परिसरात चर्चा रंगली आहे.

नवरदेवाच्या वडिलांनी नवरीच्या आईला पळवले आहे. विहीण-व्याही पळून गेल्यामुळे त्यांच्या मुलांचा विवाह मोडला आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सुरतमधील काटरगाम येथे राहणाऱया मुलाचा नवसारी येथील युवतीसोबत फेब्रुवारीमध्ये विवाह होणार होता. दोन्ही कुटुंबियांमध्ये विवाहाची जोरदार तयारी सुरू होती. परंतु, विवाहापूर्वीच मुलाचे वडिल आणि युवतीची आई पळून गेली आहे. यामुळे दोन्ही कुटुंबामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, विवाह मोडला आहे. दोन्ही कुटुंबियांनी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, नवरदेवाचे वडील आणि नवरीची आई पूर्वीपासूनच एकमेकांना ओळखत होते. दोघांचे तरुणपणी एकमेकांवर प्रेम होते. परंतु, दोघांचा विवाह होऊ शकला नव्हता. दोघांनी एकमेकांच्या मुलांचा विवाह निश्चित केला. परंतु, अनेक वर्षांनी पुन्हा एकमेकांच्या जवळ आल्यामुळे दोघांमधील प्रेम पुन्हा वाढले. विवाहास एक महिना असतानाच दोघे पळून गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निघा इथून...! विराट कोहली, अनुष्का शर्माला न्यूझीलंडच्या हॉटेलमधून बाहेर काढलं; असं नेमकं काय घडलं?

Gariaband Encounter: सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक; १० नक्षलवादी ठार, १ कोटींचं बक्षीस असणाऱ्या कमांडरचाही मृत्यू

Latest Marathi News Updates Live : नागपूरमध्ये जोरदार पावसाला सुरुवात

OBC Reservation: ''ओबीसींचं आरक्षणच संपलं..'', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत दिला जीव

Rahul Gandhi security issue : ‘’राहुल गांधींकडून नऊ महिन्यात सहा परदेश दौऱ्यात सुरक्षा प्रोटोकॉलचे उल्लंघन’’ ; 'CRPF’चं खर्गेंना पत्र!

SCROLL FOR NEXT