Eco Friendly Holi
Eco Friendly Holi sakal
देश

Eco Friendly Holi : गुजरातच्या प्रिंसनी बनवली चक्क होळी किट! यंदा झाडे न कापता केले होलिका दहन

सकाळ डिजिटल टीम

Eco Friendly Holi : गुजरातमधील अहमदाबादच्या प्रिंस पटेलनी 2019 पासून शेणाचा वापर करत अनेक वस्तू बनवल्या. त्याचा स्टार्टअप ‘केसर गौ प्रोडक्ट्स’ गोशाळामध्ये गायीच्या शेणापासून अनेक गोष्टी बनविण्यात येत आहे. या प्रोडक्टमधील एक प्रोडक्ट सध्या खूप चर्चेत आलंय.

हे प्रोडक्ट प्रिंसनी 2021 मध्ये स्वत: डिझाइन केलं होतं. प्रिंसनी या किटच्या माध्यमातून होलिका दहनला जाळल्या जाणाऱ्या लाकडांना उत्तम पर्याय दिलाय. आज आपण या विषयीच जाणून घेणार आहोत. (Gujarat boy made cow dung product Vedic holi kit for celebrating eco friendly holi)

द बेटर इंडियाशी बोलताना प्रिंसनी सांगितले की या किटला बनविण्याची कल्पना गुजरातच्या एका गावापासून आली. त्याने पाहिलं की गावात लोक होळीला होलिका दहनासाठी शेणाच्या गोवऱ्यांचा वापर करत आहे मात्र या उलट शहरात होलिका दहनासाठी झाडे कापली जात असून हजारो लाकडांचा वापर केला जातोय. त्यानंतर प्रिंसनी हे किट बनविण्याचं ठरवलं.

प्रिंसनी शहरात परतल्यानंतर एक असं किट तयार केले की ज्यामुळे लाकडासारखं खूप वेळ जळत राहणार. प्रिंसला विश्वास होता की जर शहरातल्या लोकांना हा पर्याय उपलब्ध करुन दिला तर हे लोक लाकडाऐवजी या पर्यावरण अनुकूल प्रोडक्टचा  नक्कीच वापर करणार.

या वैदिक होळी किटमध्ये त्याने 250 किलो गायीचं शेणाला वेगवेगळ्या डिझाइनमध्ये तयार केलं. जसे की बेससाठी त्याने मोठमोठ्या गोवऱ्या बनवल्या तर मधे टाकण्यासाठी त्याने थीन लेअरच्या गोवऱ्या बनवल्या आणि सर्वात वर टाकण्यासाठी त्याने आधीपेक्षाही खूप जास्त थीन गोवऱ्या बनवल्या.

यासोबतच ते या किटमध्ये कापूर, तूप, लाह्यांचा हार, गुलाल  कुंकू, श्रीफल आणि गायीच्या शेणापासून बनविलेले दिवे सुद्धा देतात.

प्रिंसनी या कामासाठी जवळपास पाच कुटूंबातील 18 लोकांना रोजगारही दिला. यावर्षी प्रिंसनी अहमदाबाद आणि गांधीनगर मध्ये या किट विकल्या. यावर्षी त्यांनी जवळपास 90 वैदिक किट विकल्या ज्या मागील वर्षाच्या तुलनेत तीन पटीने जास्त होत्या. प्रिंसला आनंद आहे की वैदिक होळी किट लोकांना आवडत आहे आणि यामुळे ते झाडांना कापण्यापासून वाचवित आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

IPL 2024 RCB vs CSK Live Score: चेन्नईला दुसरा धक्का! कर्णधारापाठोपाठ डॅरिल मिचेलही आऊट

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT