hardik patel
hardik patel  sakal
देश

एकेकाळी मोदींवर टिका करणारे हार्दिक पटेल भाजपात का जातायेत?

सकाळ ऑनलाईन

पाटीदार नेते हार्दिक पटेल गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत आहेत. १८ मे रोजी त्यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा देत काँग्रेसमधून बाहेरचा रस्ता पकडला. ट्विटरच्या माध्यमातून आपला राजीनामा जाहीर करताना त्यांनी म्हंटल कि, “आज मी मोठ्या हिमतीने काँग्रेस पक्षाच्या पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मला खात्री आहे की, माझ्या निर्णयाचे माझे सर्व सहकारी आणि गुजरातचे लोक स्वागत करतील. मला विश्वास आहे की माझ्या या पाऊलानंतर मी भविष्यात गुजरातसाठी खरोखरच सकारात्मक काम करू शकेन.”

हार्दिक पटेल यांच्या या ट्विटनंतर काँग्रेसला मोठा धक्का बसला होता. एवढंच नाही राजीनामा देताना हार्दिक पटेलांनी काँग्रेस पक्षाचा अंतर्गत कारभार चव्हाट्यावर मांडला. एकेकाळी भाजपवर रेघोट्या ओढणारे हार्दिक पटेल अचानक स्वतःच्या पक्षाचेचं वाभाडे काढतील, असा विचार कदाचितचं कोणी केला असेल.

तसं पाहिलं तर पक्षांतर्गत कारभारावर हार्दिक नाराज आहेत, ते पक्षातून बाहेर पडतील याची लक्षण आधीच दिसत होती. पक्षातून बाहेर पडल्यानंतर हार्दिक पटेल आम आजमी पक्षात प्रवेश करतील, असा अंदाजही बांधला जात होता. पण ज्या भाजप पक्षावर टीका करून हार्दिक पटेल चर्चेत आले आणि राजकारणात प्रवेश केला, त्याच पक्षाचं कमळ आता हार्दिक पटेल हातात घेणार आहेत.

आज हार्दिक पटेल १५ हजार कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये जाणार असल्याचं समजतयं. गुजरात विधानसभा २०२२ च्या निवडणुकीआधी हार्दिक पटेल यांच्या या भूमिकेमुळे एकचं खळबळ उडाली आहे.

कारण भाजप विरोधात आवाज उठवणाऱ्या नेत्यांमध्ये हार्दिक पटेल यांची गिणती व्हायची. २०१९ मध्ये सुरेंद्रनगरमध्ये झालेल्या जनआक्रोश सभेत हार्दिक पटेल यांना एका व्यक्तीच्या नाराजीला सामोरे जावे लागले होते. कार्यक्रमा दरम्यान त्यांना कानाखाली मारण्यात आली होती. त्यावेळी काँग्रेसचा भाग असलेल्या पटेल यांनी भाजप आपल्याला मारण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता.

हार्दिक पटेल म्हणाले होते की, 'ज्याप्रकारे हरेन पांड्या यांना मारले गेले आणि बनावट चकमक घडवून आणली, त्याच पद्धतीने भाजप माझ्यावर हल्ला करून मारण्याचा प्रयत्न करत आहे. मला कानाखाली मारणारा माणूस भाजप नेत्यांशी जोडला गेला आहे.'

एवढंच नाही तर हार्दिक पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील बऱ्याचदा टीका केली आहे. पंतप्रधान मोदींसाठी त्यांनी 'यमराज, 'लबाड', जनरल डायर' आणि '५६ इंच छाती वैगेरे काही नाही' अशा शब्दांचा वापर केला होता. आणि सध्याची परिस्थतीत अशी कि, एका मुलाखतीत हार्दिक यांनी नरेंद्र मोदी यांना आपला आवडता नेता म्हंटल आहे.

खरं तर हार्दिक याआधीही भाजपशी जोडले गेले होते. हार्दिक यांनी स्वत: याबाबत बोलताना म्हंटलं होत की, आम्ही भाजपशी नक्कीच जोडलेलो होतो. आनंदीबेन पटेल जेव्हा मंडलमधून निवडणूक लढवत होत्या तेव्हा त्यांनी माझ्या वडिलांना भाऊ बनवले होते. माझे वडील त्यावेळी सबमर्सिबल पंपाचा व्यवसाय करत होते आणि त्यांच्याजवळ एक कमांडर होती, ज्याच्यातून आनंदीबेन पटेल त्यांच्या निवडणूक प्रचारासाठी जायचा. माझ्या वडिलांचे भाजपशी नाते होते, या नात्यामुळे मी माझ्या आंदोलनातही आनंदीबेन पटेल यांना आत्या म्हणायचो.

पण हार्दिक यांच्या सध्याच्या भूमिकेवरून प्रश्न पडतो की, असं काय घडलं की ज्या पक्षावर टीका करून त्यांनी राजकारणात ओळख तयार केली, त्याच पक्षात त्यांनी प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, राजीनामा देताना हार्दिक यांनी म्हंटलं होत की, 'मला काँग्रेसमध्ये काम करण्याची संधी मिळाली नाही, या पक्षात माझे ऐकले गेले नाही. राहुल गांधींमुळे मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पण काँग्रेसमध्ये ते माझा बचाव करू शकले नाहीत. अशा व्यक्तीसोबत काम करण्याचा काय फायदा? मी माझा राजीनामा सोनिया गांधींकडे पाठवला आहे, त्यांच्याबद्दल माझी कोणतीही नाराजी नाही.

हार्दिक यांनी गुजरात काँग्रेस नेतृत्वावर देखील हल्लाबोल केला. त्यांनी म्हंटल की, आमच्यासारख्या लोकांनी, विशेषत: पटेल समाजाच्या लोकांनी काँग्रेसमध्ये ताकद निर्माण करावी किंवा पटेल समाजाच्या लोकांनी पक्षात महत्वाच्या भूमिकेत यावे, असे काँग्रेसला कधीच वाटत नाही. आपल्याला काँग्रेसने प्रदेश कार्याध्यक्षपद दिले. पण निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आणि अधिकार दिले नाही.

एवढचं नाही राहूल गांधींवर निशाणा साधताना हार्दिक यांनी म्हंटल की, काँग्रेस नेतृत्वामूळे हार्दिक नाराज असल्याची जाणीव राहुल गांधींना महिनाभरापासून होती. अनेक वर्षांनंतर जेव्हा राहुल गांधी दाहोदला ६ तास रॅलीसाठी येतात, आमच्यासारख्या तरुणांला राहुल गांधी ५ मिनिटे सुद्धा भेटू शकत नव्हते का? किंवा साधं बोलू शकले असते की, हार्दिक मी तुझी अडचण समजू शकतो, पक्ष नेतृत्व तुला त्रास देत आहे, पण मी मागे उभा आहे.'

काँग्रेस सोडताना हार्दिक पटेल यांनी पक्षावर निशाणा साधत म्हंटल की, अयोध्येत राम मंदिाराचा मुद्दा असो, नागरिकत्व कायदा-एनआरसीचा मुद्दा असो, जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवणे असो किंवा जीएसटी लागू करण्याचा निर्णय असो, देशात बऱ्याच वर्षांपासूल या गोष्टींची मागणी होती. पण काँग्रेस पक्ष त्यात फक्त अडथळा म्हणून काम करत राहिला. काँग्रेसची भूमिका केवळ केंद्राला विरोध करण्यापुरती मर्यादित होती.

पक्षाकडे कुठलीही दूरदृष्टी नाही, तर राज्य युनिट "जातीवर आधारित राजकारण" करत आहे. काँग्रेसचे प्रमुख नेत्यांचे लक्ष त्यांच्या मोबाईलमध्ये असतं आणि गुजरात काँग्रेसचे नेते त्यांच्यासाठी चिकन सँडविचची व्यवस्था करण्यात व्यस्त आहेत.

हार्दिक पटेल यांनी एका मूलाखतीत काँग्रेस पक्षाबद्दल नाराजी व्यक्त करताना म्हंटलं की, पक्षाची एकही कार्यकर्ता माझ्या दुःखात सहभागी झाला नाही. माझ्या वडिलांच्या निधनावर काँग्रेसमधून कोणी आले नाही. गुजरात काँग्रेसचे नेते कधीच जनतेशी जोडले गेले नाहीत, त्यामुळेच ते इतकी वर्षे सत्तेपासून दूर राहिले.

दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जगदीश ठाकोर यांनी हार्दीकच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत म्हंटल की, हार्दिकने देशद्रोहाच्या खटल्यात तुरुंगात जाण्याच्या भीतीने पक्ष सोडल्याचं म्हंटले आहे. एकेकाळी गुजरातमध्ये आरक्षणासाठी पाटीदार समाजाच्या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या हार्दिक पटेलवर सुमारे २५ गुन्हे दाखल आहेत. यामध्ये अहमदाबाद आणि सुरत येथे देशद्रोहाच्या आरोपाखाली प्रत्येकी एक एफआयआर देखील दाखल आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Live Updates : दार्जिलिंग येथे झालेल्या रेल्वे अपघातावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे ट्विट

Railway Accident History : ९ रेल्वे अपघात ज्यांनी संपूर्ण देशाला हादरवलं; जाणून घ्या भीषण अपघातांचा इतिहास

पुण्यातील पोर्शे कार अपघाताची आळंदीत पुनरावृत्ती? अल्पवयीन मुलाकडून महिलेच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न

Train accidents in India: रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवांच्या कारकिर्दीत झालेत भीषण अपघात! राजीनाम्याची सतत मागणी, मात्र....

Vat Purnima 2024 : यंदाच्या वटपौर्णिमेला करा मराठमोळा साज, 'या' प्रकारच्या साड्या नेसून करा पूजा, दिसाल एकदम झकास.!

SCROLL FOR NEXT